कमीत कमी खर्चामध्ये घरबसल्या लाखो रुपये कमवायचे तर ‘हा’ व्यवसाय ठरेल फायद्याचा! मागणी देखील आहे खूप आणि पैसे देखील मिळतात जास्त

कुठलाही व्यक्ती जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा तो कमीत कमी पैशांमध्ये आणि चांगला झालेला असा व्यवसायाच्या शोधात असतो. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला दिसून येतात. जे कमीत कमी खर्चामध्ये सुरू करता येतात. परंतु यामध्ये कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबतीत मात्र बऱ्याचदा गोंधळ उडतो.

Business Idea:- कुठलाही जर व्यवसाय करायचा असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर आपल्याला किती पैसे किंवा किती भांडवल त्यासाठी गुंतवावे लागेल याचा विचार अगोदर केला जातो व त्या व्यवसायाला असलेली मागणी हे देखील खूप महत्त्वाचे असते.

कुठलाही व्यक्ती जेव्हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा तो कमीत कमी पैशांमध्ये आणि चांगला झालेला असा व्यवसायाच्या शोधात असतो. असे अनेक प्रकारचे व्यवसाय आपल्याला दिसून येतात. जे कमीत कमी खर्चामध्ये सुरू करता येतात. परंतु यामध्ये कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबतीत मात्र बऱ्याचदा गोंधळ उडतो.

या पार्श्वभूमीवर तुम्हाला देखील कमी खर्चामध्ये चांगला चालणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर या लेखामध्ये आपण अशाच एका व्यवसायाची माहिती घेणार आहोत. जो तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये सुरू करता येऊ शकतो व या माध्यमातून तुम्ही काही दिवसांनी लाखो रुपये देखील कमवू शकतात.

क्लाऊड किचनचा व्यवसाय ठरेल फायद्याचा
क्लाऊड किचनचा व्यवसाय जर आपण बघितला तर हा एक खूप फायदेशीर असा व्यवसाय असून हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला रेस्टॉरंट प्रमाणे कुठल्याही पद्धतीचा सेटअप करण्याची गरज भासत नाही. यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑर्डरच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत फक्त खाद्यपदार्थ पोहोचवावे लागतात.

कमी खर्च व कमी मेहनती शिवाय चांगला नफा देणारा हा व्यवसाय आहे. तुम्हाला जर तुमच्या स्वयंपाकाची आवड व्यवसायामध्ये बदलायची असेल तर क्लाऊड किचन हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम असा व्यवसाय सिद्ध होऊ शकतो. क्लाऊड किचन म्हणजे काय हे जर पाहिले तर साधारणपणे तुम्ही या किचनला ऑनलाइन रेस्टॉरंट म्हणून पाहू शकतात.

यामध्ये ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज भासत नाही. ग्राहक फक्त त्यांना लागणारे अन्न म्हणजेच फूड ते ऑनलाईन ऑर्डर करतात आणि ऑर्डर केलेले खाद्यपदार्थ फक्त ग्राहकाच्या घरी पोहोचवावे लागते.

क्लाऊड किचन व्यवसायामध्ये स्वयंपाक बनवणे आणि तो पोहोचवणे एवढेच काम केले जाते. अगदी घरून किंवा छोट्या जागेत तुम्ही सुरुवातीला छोट्या प्रमाणामध्ये या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.

काही विशेष पदार्थ देखील घरी तयार करू शकता आणि सणासुदीच्या वेळी ऑर्डर घेऊ शकता व रेस्टॉरंट आणि ऑफिसला खाद्यपदार्थ पुरवू शकता.

क्लाऊड किचन व्यवसाय फायद्याचा का ठरतो?
क्लाऊड किचन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जागा किंवा इतर रेस्टॉरंट प्रमाणे सजावट करण्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. तसेच यामध्ये स्वयंपाक घरात तेवढे काम केले जाते व त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांची गरज भासत नाही.

तसेच क्लाऊड किचन व्यवसायामध्ये सध्या फारसे लोक दिसून येत नाही व त्यामुळे स्पर्धा कमी असल्याने तुम्ही या व्यवसायात तुमचा जम सहजपणे बसवू शकतात.

तसेच आजकालच्या लोकांचा जर ट्रेंड बघितला तर ऑनलाईन पद्धतीने जेवण ऑर्डर करण्याकडे जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यामुळे क्लाऊड किचन व्यवसायाला चांगली संधी या माध्यमातून निर्माण होऊ शकते.

कसा सुरू कराल क्लाऊड किचन व्यवसाय?
तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून किंवा एखादी छोटीशी जागा भाड्याने घेऊन त्यावर हा व्यवसाय सुरू करू शकतात. हा व्यवसाय सुरू करताना स्वतःचे एक ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट तयार करावी. जेणेकरून एप्लीकेशन किंवा वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहक तुमच्याकडे ऑर्डर करू शकतील.

तसेच आवश्यक असलेली भांडी तसेच रेशन व फ्रिज इत्यादी आवश्यक गोष्टी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतील. तसेच तुम्ही स्विगी किंवा झोमॅटो सारख्या एप्लीकेशनवर नोंदणी करून डिलिव्हरी पार्टनर बनु शकतात. साधारणपणे हा व्यवसाय घरून जर सुरू केला तर 25000 रुपयांपर्यंत तुम्हाला सुरुवातीला खर्च येईल मोठ्या प्रमाणावर म्हणजेच व्यावसायिक स्तरावर सुरू करायचा असेल तर चार ते पाच लाख रुपये भांडवल लागू शकते.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला अन्न सुरक्षिततेकरिता FSSAI परवाना, कराकरिता जीएसटी नोंदणी व व्यवसायाची नोंदणी करण्यासाठी महानगरपालिका परवाना इत्यादी लागेल. अशा प्रकारचे सर्वपरवाने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकतात किंवा एखाद्या तज्ञाची मदत या मध्ये घेऊ शकतात.

कशी कराल तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग?
कुठल्याही व्यवसायातची प्रगती किंवा वाढ करण्याकरिता मार्केटिंग खूप गरजेचे असते. तुम्ही फेसबुक तसेच instagram आणि whatsapp सारखा सोशल मीडियाचा वापर करू शकतात व या माध्यमातून तुमच्या व्यवसायाचा प्रचार करू शकतात. तसेच एखाद्या तज्ञाकडून तुम्ही डिजिटल मार्केटिंग देखील करू शकतात.

सण आणि उत्सवाच्या कालावधीमध्ये तुम्ही एखादी चांगली ऑफर देऊन ग्राहक मोठ्या संख्येने जोडू शकतात.या व्यवसायामध्ये ग्राहकांनी ऑर्डर दिल्यानंतर वेळेवर ऑर्डर पोहोचवणे आणि खाद्यपदार्थांचा दर्जा उत्तम ठेवणे हे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर योग्य नियोजन केले आणि कठोर परिश्रम घेतले तर या व्यवसायातून दरमहा लाखोंचे उत्पन्न तुम्ही मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe