Cheapest Loan Tips:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला पैशाची गरज भासते तेव्हा अशी गरज भागवण्यासाठी रोख रक्कम किंवा आपल्या स्वतःकडे पैसा असतोच असे नाही. तेव्हा आपण पैशाची गरज भागवण्यासाठी कर्जाचा पर्याय स्वीकारतो.
यामध्ये कधी मित्र किंवा नातेवाईकांकडून उसनवार किंवा कर्जरूपाने पैसा घेतो किंवा बँक, इतर वित्त संस्थेच्या माध्यमातून कर्जासाठी अर्ज करतो. याबद्दल जास्त करून वैयक्तिक म्हणजेच पर्सनल लोन घेण्याकडे जास्त करून आपल्याला कल दिसून येतो. परंतु जर आपण अशा पद्धतीने जर कर्ज घेत असाल तर आपल्याला त्याची परतफेड मासिक हप्त्याच्या रूपात करावी लागते.
त्यामुळे तुम्ही कमी व्याज दरात वैयक्तिक कर्ज मिळवणे खूप गरजेचे असते. कारण कमी व्याजापुढे तुम्हाला कर्जाची परतफेड लवकर करता येते व जास्तीचे पैसे देखील द्यावे लागत नाही. याकरिता तुम्ही कर्ज घेण्या अगोदर काही टिप्स समजून घेणे खूप गरजेचे आहे.
कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर वापरा या टिप्स
1- क्रेडिट स्कोरकडे लक्ष द्या– बँक किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाची संकल्पना म्हणजे क्रेडिट स्कोर होय. तुमचा क्रेडिट स्कोर जर उत्तम असेल तर तुम्हाला सहजपणे आणि कमीत कमी व्याज दरात कर्ज मिळू शकते.
चांगला क्रेडिट स्कोर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची बिले किंवा इतर हप्ते नियमितपणे भरतात व अशा परिस्थितीत तुम्ही जर बँकेकडून कर्ज मागायला गेलेत तर घेतलेले कर्ज तुम्ही वेळेवर परत करू शकता असा विश्वास बँकेला येतो व तुम्हाला ताबडतोब कर्ज मंजूर केले जाते व तेही कमीत कमी व्याज दरात.
2- बँकांमध्ये तुलना करणे– तुम्हाला तर मोठ्या रकमेचे कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही कर्ज घेण्याअगोदर बँकांची एकमेकांशी तुलना करू शकतात. ही तुलना करताना वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तसेच कर्ज मंजुरीच्या बाबतीत असलेले काही छुपे शुल्क पाहणे खूप गरजेचे असते.
तसेच बँका काही प्रोसेसिंग फी वगैरे आकारात आहे का? तसेच व्याजदर निश्चित आहे की किंवा शिल्लक कमी करण्यावर किंवा इतर कोणतेही शुल्क आकारले जात आहे का याबाबतीत तुलना करून पाहणे गरजेचे आहे.
3- बँकांशी वाटाघाटी करणे– जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या बँकांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जाची तुलना करतात तेव्हा व्याजदराबाबत त्यांच्याशी बोलणी करणे खूप गरजेचे आहे व यामध्ये न संकोच करता तुम्ही वाटाघाटी करून तुम्हाला अधिक परवडणाऱ्या दराने कर्ज मिळवू शकतात.
4- योग्य कर्जाची निवड– कर्जाचे दोन प्रकार असतात व यामध्ये एक सुरक्षित कर्ज व दुसरे म्हणजे असुरक्षित कर्ज होय. तुम्ही जर वैयक्तिक कर्ज घेत असाल तर हे असुरक्षित प्रकारातले कर्ज आहे. म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची तारण देण्याची आवश्यकता नसते.
परंतु सुरक्षित कर्जाची व्याजदर हे असुरक्षित कर्ज पेक्षा कमी असतात. त्यामुळे तुम्ही असुरक्षित कर्ज न घेता सुरक्षित स्वरूपाचे कर्ज घेणे गरजेचे असते व ते कर्ज तुम्हाला कमी व्याजारात मिळते.
त्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंड किंवा एफडी केली असेल किंवा इतर कोणतीही गुंतवणूक केलेली असेल तर यावर सुरक्षित प्रकारातले कर्ज घेऊ शकता व कमी व्याजदरात ते तुम्हाला मिळू शकते.
5- कर्ज परतफेडीचा कालावधी पाहणे– जेव्हा आपण बँकेच्या माध्यमातून कर्ज घ्यायला जातो तेव्हा ते कर्ज दीर्घ कालावधीसाठी घेतले व दीर्घ कालावधी करिता ईएमआय केला तर कमी व्याजाची ऑफर आपल्याला बँक देत असते.
परंतु यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की तुम्ही कमी व्याज देत आहात परंतु ते दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला द्यावे लागेल. त्यामुळे असे न करता तुम्हाला परवडेल अशा पद्धतीने कर्जाचा कालावधी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तुम्ही तुमच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकाल आणि तुमच्या खिशातून जास्तीचे पैसे जाणार नाहीत.