Personal Loan:- आयुष्यामध्ये व्यक्तीला बऱ्याचदा कर्ज घ्यायची पाळी येते अशावेळी आपण विविध बँका तसेच खाजगी वित्तीय संस्था, मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून कर्जरूपाने पैसा घेतो. बऱ्याचदा वैद्यकीय समस्या किंवा लग्नकार्य,
मुलांचे शिक्षण इत्यादीसाठी पैशांची गरज व्यक्तीला भासतेस. याकरिता बरेच व्यक्ती पर्सनल लोनचा मार्ग अवलंबतात व पर्सनल लोनसाठी बँकांकडे अर्ज करतात. कुठलेही लोन घेताना सर्वप्रथम व्याजदर किती आहे हे पाहणे खूप गरजेचे असते.
कारण बँकांचा विचार केला तर प्रत्येक बँकांचा व्याजदर हा वेगळा आहे. तसेच वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन घेण्यापूर्वी बँक हा संबंधित ग्राहकांचा सिबिल स्कोर देखील तपासतात. या अनुषंगाने देखील व्याजदरामध्ये फरक पडत असतो. यामध्ये पर्सनल लोन देणाऱ्या बँकांची यादी पाहिली तर बऱ्याच बँका पर्सनल लोन देतात.
परंतु यामध्ये तीन सरकारी बँका सर्वात स्वस्त दरामध्ये वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन पुरवतात. उदाहरणच द्यायचे झाले तर युनियन बँकेच्या माध्यमातून 8.90% व्याजदराने पर्सनल लोन दिले जाते व इतर बँकांच्या तुलनेमध्ये हे सर्वात स्वस्त वैयक्तिक कर्ज आहे.
पाच वर्षाकरिता जर तुम्हाला पाच लाख रुपयांचे पर्सनल लोन हवे असेल तर तुम्हाला या दरानुसार प्रत्येक महिन्याला दहा हजार तीनशे पंचावन्न रुपयांचा ईएमआय बसतो. त्यानंतर सेंट्रल बँक देखील परवडणारी बँक आहे व ही बँक देखील तुम्हाला 8.90 टक्के व्याजदरानेच पर्सनल लोन देते.
सेंट्रल बँकेतून जर पर्सनल लोन घेतले तर याचा ईएमआय देखील तुम्हाला दहा हजार तीनशे पंचावन्न रुपये द्यावे लागेल. या दोन्ही बँकांच्या व्यतिरिक्त पंजाब नॅशनल बँक देखील ८.९०% व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते. त्यानंतर इंडियन बँकेचे पर्सनल लोन देखील परवडणारे असून त्याचा व्याजदर 9.5% पासून सुरू होतो. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र हे 9.45 टक्के व्याजदराने वैयक्तिक कर्ज देते.
सर्वात स्वस्त पर्सनल लोन देणाऱ्या बँकांची यादी व त्यांचे व्याजदर
युनियन बँक व्याजदर 8.90%, सेंट्रल बँक व्याजदर 8.90%, पंजाब नॅशनल बँक 9.50%, आयडीबीआय बँक व्याजदर 9.50%, स्टेट बँक ऑफ इंडिया व्याजदर 9.60%, बँक ऑफ बडोदा दहा टक्के, युको बँक 10.5%, कोटक बँक 10.25%,
बँक ऑफ इंडिया 10.35%, आयसीआयसीआय बँक 10.50%, इंडसइंड बँक अकरा टक्के, धनलक्ष्मी बँक 11.90%, ॲक्सिस बँक 12% आणि कर्नाटका बँक 12.45% इत्यादी बॅंका परवडणाऱ्या व्याजदरामध्ये वैयक्तिक अर्थात पर्सनल लोन देतात.