अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खातेधारकांसाठी नवीन सर्विस चार्ज 1 जुलै 2021 पासून लागू होईल.
नवीन शुल्क एटीएममधून पैसे काढणे, चेकबुक, ट्रांसफर आणि इतर बिगर आर्थिक व्यवहारांवर लागू होतील. एसबीआय बेसिक बचत खाते वैध केवायसी कागदपत्रे देऊन कोणीही उघडू शकतो.
एसबीआय बीएसबीडी खात्यात आवश्यक किमान शिल्लक शून्य आहे आणि या खात्यात जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नाही. बीएसबीडी खातेधारकांना बेसिक रूपे एटीएम कम डेबिट कार्ड देखील मिळते. चला नवीन चार्जेजबद्दल जाणून घेऊया.
एसबीआय शाखेत रोख पैसे काढणे :- चार मोफत रोख पैसे काढल्यानंतर बँक शुल्क आकारेल, ज्यामध्ये शाखा आणि एटीएम या दोन्हीठिकाणी शुल्क आकारले जाईल.
दुसऱ्या शब्दांत, बँकेच्या बीएसबीडी खातेधारकास एका महिन्यात चारपेक्षा जास्त विनामूल्य रोख पैसे काढण्यासाठी सर्व्हिस चार्ज भरावा लागेल. ग्राहकांना प्रत्येक रोख रक्कम काढण्याच्या व्यवहारासाठी शाखा किंवा एटीएमवर 15 रुपये अधिक जीएसटी असा चार्ज द्यावे लागतील.
एसबीआय एटीएममध्ये कॅश काढणे ‘:- एसबीआयने म्हटले आहे की चार मोफत रोख रक्कम काढल्यानंतर सर्व एटीएम व शाखांमध्ये सेवा शुल्क घेण्यात येईल. चार विनामूल्य पैसे काढल्यानंतर सर्व एसबीआय आणि एसबीआय नसलेल्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी 15 रुपये अधिक जीएसटी आकारला जाईल.
चेकबुक चार्ज :- एसबीआय आर्थिक वर्षात बीएसबीडी खातेदारांना 10 चेक लीफ विनाशुल्क देईल. त्यानंतर 10 लीफ चेक बुकसाठी 40 रुपये अधिक जीएसटी असा चार्ज आकारला जाईल. 25 लीफ चेकबुकसाठी 75 रुपये प्लस जीएसटी चार्ज आकारला जाईल.
10 लीफच्या इमरजेंसी चेक बुकसाठी 50 रुपये प्लस जीएसटी द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील नवीन सेवा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. एसबीआय आणि बिगर एसबीआय शाखांमध्ये बीएसबीडी खातेदारांना गैर-आर्थिक व्यवहारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम