अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :-विदेशी फंडचे अकाउंट फ्रीज झाल्याच्या वृत्तामुळे अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये 5 ते 16 टक्क्यांपेक्षा कमी घट झाली आहे.
त्याचा परिणाम कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये दिसून येत आहे. तसेच याचा मोठा फटका गौतम अदानी यांना बसला असून त्यांचे 73 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त (10 अब्ज डॉलर्स) नुकसान झाले आहे.
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड अर्थात NSDL ने अदानी ग्रुपमध्ये पैसे गुंतवलेल्या तीन विदेशी फर्मचे खाती फ्रीज केल्याची बातमी समोर आली. अल्बुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड या तीन फर्ममधले तब्बल 43500 कोटी रुपयांचे शेअर्स फ्रीज केले आहेत.
अकाऊंट फ्रीज झाले म्हणजे अदानी ग्रुप या फंडची कोणतीही सध्याची सिक्युरिटी विकू शकतो आणि खरेदी सुद्धा करु शकत नाही. अदानी ग्रुपमधील काही एफपीआय खाते जप्त केल्याच्या बातमीनंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सोमवारी 25 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
या दरम्यान अदानी एन्टरप्रायझेस बीएसई 24.99 टक्के घसरण झाली, अदानी पोर्ट्स अॅंड स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये 18.75 टक्क्यांनी घसरण झाली. या व्यतिरिक्त अदानी ग्रीन एनर्जी पाच टक्के, अदानी टोटल गॅस पाच टक्के, अदानी ट्रान्समिशन पाच टक्के, अदानी पॉवरचे शेअर्स 4.99 टक्क्यांनी घसरले.
दरम्यान अदानी ग्रुपच्या काही कंपन्यांच्या शेअर्सने मोठी उसळी यावर्षी घेतली होती. यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीत सुमारे 40 अरब डॉलरची वाढ झाली होती. ज्यानंतर ते आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बनले होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम