Post Office Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टीने पोस्ट ऑफिसच्या योजनांना मोठ्या प्रमाणावर सध्या पसंती दिली जात आहे. गुंतवणुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि मिळणारा चांगला परतावा याकरिता पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण सध्या वाढताना आपल्याला दिसून येत आहे.
तसेच पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील वेगवेगळे गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिले असून अनेक आकर्षक अशा योजना देखील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.यामध्ये अनेक बचत योजना तर आहेतच परंतु एफडी सारख्या महत्वाच्या योजना देखील पोस्ट ऑफिस राबवत आहे.
अशाच प्रकारे जर आपण फिक्स डिपॉझिट साठी महत्वाच्या असलेल्या योजनांच्या शोधात असाल तर पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना देखील एक उत्तम नफा देणारी योजना म्हणून ओळखली जाते.
या योजनेमध्ये जर तुम्ही पाच वर्षाच्या कालावधी करिता एफडीत गुंतवणूक केली व त्या पाच वर्षांमध्ये पुन्हा पाच वर्षाची मुदत वाढवली तर एकूण दहा वर्षांमध्ये तुम्ही या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त व्याजाचा लाभ मिळवू शकतात. त्यामुळे या योजनेची सविस्तर माहिती या लेखात आपण घेऊ.
फायद्याची आहे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना
पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना ही एक चांगला परतावा मिळवण्यासाठी महत्त्वाची योजना असून या योजनेमध्ये तुम्हाला पाच वर्षांच्या कालावधीकरिता एफडीमध्ये गुंतवणूक करता येते व जर तुम्ही पुन्हा पाच वर्षांची मुदत वाढवली तर एकूण दहा वर्षांमध्ये तुम्ही गुंतवणुकीतून जास्तीत जास्त व्याजाचा फायदा या योजनेतून मिळवू शकतात.
सध्या पोस्ट ऑफिसच्या या पाच वर्षाच्या टाईम डिपॉझिट वर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात असून तुम्ही जर दहा वर्षांकरिता पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला यावर पाच लाख 51 हजार 175 रुपये व्याज मिळेल व योजनेच्या मॅच्युरिटीवर एकूण दहा लाख 51 हजार 175 रुपये इतकी रक्कम तुम्हाला मिळेल.
दहा वर्षासाठी चार लाख जमा केले तर…
तुम्ही जर पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट मध्ये दहा वर्षाच्या कालावधी करिता चार लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 7.5% दराने व्याज दिले जाईल. या दहा वर्षांमध्ये तुम्हाला चार लाख 40 हजार 940 रुपये व्याज व योजना मॅच्युरिटी झाल्यानंतर मुद्दल व व्याज मिळून एकूण आठ लाख 40 हजार 940 रुपये मिळतील.
दहा वर्षासाठी तीन लाख गुंतवले तर…
पोस्टाच्या या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये तुम्ही दहा वर्षांकरिता तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याजापोटी तीन लाख तीस हजार सातशे पाच रुपये व्याज मिळेल व योजना मॅच्युअर झाल्यावर मुद्दल व व्याज मिळून तुम्हाला सहा लाख तीस हजार सातशे पाच रुपये मिळतील.
दहा वर्षां करिता दोन लाख रुपये जमा केल्यास…
तुम्ही पोस्टाच्या या टाईम डिपॉझिटमध्ये जर दहा वर्षांकरिता दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला त्या दोन लाख रुपयांवर दोन लाख वीस हजार 470 रुपये व्याज मिळेल व योजना मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला मुद्दल व व्याज मिळून चार लाख वीस हजार 470 रुपये मिळतील.
दहा वर्षांकरिता एक लाख रुपये गुंतवले तर…
या योजनेमध्ये जर तुम्ही दहा वर्षांकरिता एक लाखाc गुंतवणूक केली तर तुम्हाला व्याजापोटी एक लाख दहा हजार दोनशे पस्तीस रुपये व योजना मॅच्युअर झाल्यानंतर मुद्दल व व्याज मिळून दोन लाख दहा हजार दोनशे पस्तीस रुपये मिळतील.