Income Tax Rule: तुम्ही देखील अशा पद्धतीचे व्यवहार केले असतील तर येऊ शकतात आयकर विभागाच्या रडारवर! येऊ शकते नोटीस

Published on -

Income Tax Rule:- सध्या देशातील जे काही आयकरदाते आहेत त्यांच्या माध्यमातून या नवीन आर्थिक वर्षाकरिता कर भरणा  सुरू झालेला असून आयकर  विभागाच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

आयकर विभागाच्या माध्यमातून करदात्यांसाठी बऱ्याच प्रकारचे नियम असतात व ते नियम पाळून यासंबंधीची कार्यवाही पार पाडावी लागते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे कोणताही व्यक्ती ज्या पद्धतीने व्यवहार करत असतो त्याची सगळी माहिती आयकर विभागाला कळत असते.

त्यामुळे आयकर खात्याच्या नियमा बाहेर जर काही व्यवहार आढळून आले व संबंधित खात्याकडून जर तशी तपासणी करण्यात आली तर तुम्हाला आयकर विभागाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागू शकते.त्यामुळे टॅक्स भरताना कोणत्या चुका तुम्हाला समस्या निर्माण करू शकतात? याबद्दलची माहिती बघू.

 आयकर भरताना या चुका टाळा

1-जर तुम्ही सरकारी, खाजगी किंवा सहकारी बँकेमध्ये एका वर्षात दहा लाखात व त्यापेक्षा जास्तीची रक्कम जमा केली असेल तर तुम्हाला त्या रकमेची संपूर्ण माहिती आयकर विभागाला देणे गरजेचे असते. तुम्ही जर असे केले नाही तर इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता वाढते.

2- समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करत असाल व एका आर्थिक वर्षामध्ये तीस लाखात व त्यापेक्षा जास्त रकमेची मालमत्ता रोख स्वरूपामध्ये खरेदी करत असाल तर नोंदणी आणि मुद्रांक विभाग अशा व्यवहारांची माहिती इन्कम टॅक्स विभागाला देईल व तुम्ही जर आयकर रिटर्न भरताना अशी माहिती दिली नाही तर तुम्हाला त्यासंबंधी विचारणा केली जाऊ शकते.

3- तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल व क्रेडिट कार्ड बिलचे पेमेंट करताना एक लाख रुपये पेक्षा अधिक बिल असेल आणि तुम्ही ते रोख स्वरूपामध्ये भरत असाल तर आयकर खाते नोटीस पाठवू शकते. समजा तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे क्रेडिट कार्ड बिल पेमेंट रोख स्वरूपात भरले असेल तर त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत तुम्हाला सांगणे गरजेचे असते.

4- तसेच तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली असेल तर याबाबत देखील तुम्हाला इन्कम टॅक्स विभाग विचारू शकते. सरळपणे बघितले तर आयकर खात्याच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षांमध्ये जर दहा लाख रुपयांचे गुंतवणूक तुम्ही करत असाल तर ते तुम्हाला समस्या निर्माण करू शकते.

5- मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तरी काळजी घेणे गरजेचे असते. समजा तुम्ही एका आर्थिक वर्षामध्ये एफडीत दहा लाख रुपये पेक्षा जास्तची रोख रक्कम जमा करत असाल तर तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा स्त्रोत कोणता आहे त्याची माहिती द्यावी लागते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe