Insta Personal Loan:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला पैशाची गरज भासते तेव्हा आपण पैसे मिळवण्यासाठी अनेक पर्यायाचा वापर करतो व त्या माध्यमातून आपली आर्थिक गरज पूर्ण करत असतो. जर आपण बँकांव्यतिरिक्त इतर नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी पाहिल्या तर बँकांच्या तुलनेमध्ये अगदी झटपट कर्ज देण्यामध्ये ते आपल्याला पुढे दिसून येतात.
यामध्ये अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहेत व त्यामध्ये जर आपण बजाज फायनान्सच्या दृष्टिकोनातून बघितले तर या बजाज फायनान्स कडून पूर्व मंजूर म्हणजेच प्री अप्रूव्ह कर्ज प्रस्तावाच्या माध्यमातून आपण आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सहजपणे पैशांचे मॅनेजमेंट करू शकतो.
आपल्याला माहित आहे की जर आपल्याला कर्ज मिळवायचे असेल तर अनेक प्रकारचे टप्प्यांमध्ये आपल्याला जावे लागते व तेव्हा कुठे आपल्याला पैसा मिळत असतो. परंतु बजाज फायनान्सच्या माध्यमातून पूर्व मंजूर कर्ज हा जो काही प्रकार आहे याच्या माध्यमातून आपल्याला कर्ज मिळण्यासाठी लागणारा वेळ टाळू शकतो.
बजाज फायनान्सच्या माध्यमातून देण्यात येणारे इन्स्टा पर्सनल लोन हे ताबडतोब आर्थिक गरजा भागवण्यासाठी एक चांगला उपाय आहे. या अंतर्गत तुम्ही काही मिनिटात पैसे मिळवू शकतात. जर तुम्ही बजाज फायनान्सचे ग्राहक असाल तर तुम्हाला अगदी 30 मिनिटे ते चार तासांच्या आतमध्ये ताबडतोब पर्सनल लोन मिळणे शक्य आहे.
तसेच नवीन ग्राहक हे त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ओटीपीचा वापर करून यांच्या पूर्व मंजूर कर्जाची मर्यादा निश्चित करू शकतात. कारण पूर्व मंजूर प्रस्ताव प्रक्रिया जी असते ती अगदी सुलभ असते व आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये पटकन कर्ज मिळण्याची खात्री देते.
बजाज फिन्सर्वच्या वेबसाईटवर तुम्ही इन्स्टा पर्सनल लोन साठी करू शकतात अर्ज
1- बजाज फिनसर्व्ह च्या वेबसाईटवरील इन्स्टा पर्सनल लोन पेजला भेट द्या आणि चेक ऑफरवर क्लिक करावे.
2- त्यानंतर तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर नमूद करावा आणि ओटीपी सह तुमची प्रोफाइल बनवावी.
3- त्यानंतर स्क्रीनवर एक पूर्वनियोजित असलेला कर्ज मर्यादेचा एक प्रस्ताव तुम्हाला दाखवला जातो. त्यामध्ये तुम्ही एक तर तो प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा त्यापेक्षा तुम्हाला जर कमी रक्कम हवी असेल तर त्याची निवड करू शकतात.
4- त्यानंतर खाली तुम्हाला कर्ज परतफेड ची मुदत दिलेली असते व त्या पर्याया मधून तुम्हाला परतफेडची मुदत हा पर्याय निवडावा लागतो.
5- नंतर तुम्ही पुढची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रोसीडवर क्लिक करावे.
त्यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की तुम्ही जर बजाज फायनान्सचे विद्यमान ग्राहक असाल किंवा नवीन ग्राहक असाल तर यामुळे या प्रक्रियेमध्ये थोडा बदल होऊ शकतो. तसेच काही ग्राहकांना कर्जाची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही अतिरिक्त कागदपत्रे देखील द्यावे लागू शकतात.
बजाज फिनसर्व्ह इन्स्टा पर्सनल लोनची प्रमुख वैशिष्ट्ये
1- कमीत कमी कालावधीत कर्ज वितरण– यामध्ये काही ग्राहकांना आवश्यक असलेले पैसे अगदी 30 मिनिटे ते चार तासांमध्ये मिळणे शक्य आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही सुविधा फायद्याचे ठरते.
2- उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही– तसेच महत्त्वाचे म्हणजे निवडक विद्यमान ग्राहक उत्पन्नाचा पुरावा किंवा केवायसी कागदपत्रे यासारखी कोणतीही कागदपत्रे सादर न करता बजाजच्या माध्यमातून हे इन्स्टा पर्सनल लोन मिळवू शकतात.
3- कर्ज परतफेडीचा लवचिक कालावधी– तुमची आर्थिक गरज आणि तुमची परतफेडचे अंदाजपत्रक त्यानुसार तुम्ही सहा ते 63 महिन्यांच्या कालावधीची निवड कर्ज परतफेडीसाठी करू शकतात. यामध्ये तुमच्या दररोजचे जे काही आर्थिक गरजा आहेत त्यांच्याशी तुम्ही कुठल्याही पद्धतीची तडजोड किंवा भार न टाकता कर्ज परतफेडीची मुदत निवडू शकतात व तशी अनुमती तुम्हाला देण्यात येते.
तसेच इन्स्टा पर्सनल लोन ईएमआय कॅल्क्युलेटर च्या साह्याने तुम्ही तुमच्या कर्जाची रक्कम तसेच व्याजाचा दर व मुदत इत्यादी टाकून तुमचा मासिक हप्त्याचा अंदाज लावू शकतात. त्यामुळे तुम्ही कर्जाच्या वेगवेगळ्या रकमांच्या हप्त्याची तुलना करू शकतात व तुमची परतफेडची क्षमता पाहून योग्य पर्याय निवडू शकता.
अशाप्रकारे तुम्ही तुमची तातडीची आर्थिक गरज भागवण्यासाठी इन्स्टा पर्सनल लोन या चांगल्या पर्यायाची निवड करून पूर्व मंजूर प्रस्तावांचा लाभ घेऊन दीर्घ आणि अनेकदा लांबलचक कर्ज प्रक्रिया टाळून अगदी 30 मिनिटे ते चार तासांच्या आत पैसे मिळवू शकतात व तुमच्या आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भागवू शकतात.