Mutual Fund SIP : प्रत्येकाची इच्छा असते की त्यांची मुले श्रीमंत व्हावीत आणि त्यांच्या आयुष्यात कोणतीही आर्थिक समस्या येऊ नये. म्हणूनच आज बाजारात अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करून तुमच्या मुलाला भविष्यात श्रीमंत बनवू शकता. मात्र तुम्हाला यासाठी योग्य नियोजन करून गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
तुम्ही महिन्याला फक्त 2500 रुपये गुंतवायला सुरुवात केली तरी तुमचा मुलगा वयाच्या 25 व्या वर्षी करोडपती होऊ शकतो. यासाठी तुम्ही चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

जोपर्यंत गुंतवणुकीच्या योजनेचा संबंध आहे, म्युच्युअल फंडात दर महिन्याला 2500 रुपये गुंतवणूक करा. जर हे 25 वर्षे चालू राहिले तर तुमचा मुलगा करोडपती होईल. पण म्युच्युअल फंड योजनेने दरवर्षी सरासरी 12% परतावा दिला पाहिजे. अशा म्युच्युअल फंडाची यादी खाली दिली आहे, जे उत्तम परतावा देतात.
जर अशा प्रकारे पैसे जमा केले तर 25 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 30 लाख रुपये होईल. त्याच वेळी, परतावा म्हणून 70 लाख रुपये मिळतील. अशा प्रकारे एक कोटी रुपयांचा निधी निर्माण होणार आहे.
जर तुम्हाला दरवर्षी गुंतवणूक वाढवायची नसेल तर, तुम्ही दरमहा ५१०० रुपयांची गुंतवणूक सुरू करू शकता. चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत दरमहा ५१०० रुपये गुंतवले तर २५ वर्षांत थेट १ कोटी रुपयांचा निधी तयार होईल.
टॉप 5 म्युच्युअल फंड योजना :-
-क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 27.02 टक्के
-क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना : 24.10 टक्के
-Axis स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना : 23.54 टक्के
-क्वांट अॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना : 22.38 टक्के
-टक्के क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड : 20 टक्के