Post Office FD Scheme:- गेल्या काही वर्षापासून बघितले तर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांकडून पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक ही जोखीममुक्त आणि सुरक्षित असते व व्याजदर चांगले मिळत असल्याने खात्रीशीर परतावा देखील मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आहेत व मुदत ठेव म्हणजे एफडी योजना देखील महत्त्वाचे आहेत. यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट स्कीम ही योजना बघितली तर गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय असून ज्यांना जोखीम मुक्त आणि सुरक्षित अशी गुंतवणूक करायची आहे व खात्रीशीर परतावा मिळवायचा आहे
अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना खूप फायद्याची आहे. या योजनेत जर गुंतवणूक केली तर स्थिर उत्पन्न तर मिळतेच परंतु कर बचतीचा फायदा देखील मिळतो. त्यामुळे पोस्ट ऑफिस एफडी योजना गुंतवणुकीसाठी फायद्याची ठरू शकते.
कशी आहे पोस्ट ऑफिसची एफडी योजना?
पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. जर तुम्हाला देखील या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडावे लागते व या खात्यामध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक बजेटनुसार किमान एक हजार रुपये ते 100 च्या पटीत रक्कम जमा करू शकतात.
या योजनेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कमाल गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त कितीही पैशांची गुंतवणूक यामध्ये करू शकतात व इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार या योजनेचा गुंतवणूक कालावधी निवडू शकतात. जसे की तुम्ही यामध्ये एक वर्ष,
दोन आणि तीन वर्ष किंवा पाच वर्ष कालावधीसाठी ठेव ठेवू शकतात. प्रत्येक कालावधीसाठी वेगवेगळ्या व्याजदर आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार योजना निवडण्याची सोय यामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही जर मोठ्या रकमेची गुंतवणूक केली तर तुम्हाला योजना परिपक्व झाल्यानंतर जास्त परतावा मिळतो.
मिळणारा व्याजदर आणि कर लाभ
पोस्ट ऑफिस एफडी योजनेचा व्याजदर तुम्ही निवडलेल्या कालावधीवर अवलंबून असतो. एक वर्षाच्या कालावधीसाठी 6.9% इतका व्याजदर मिळतो तर दोन आणि तीन वर्षाच्या एफडीवर सात टक्के इतका व्याजदर मिळतो. तसेच पाच वर्षाच्या कालावधी करिता तुम्ही एफडी केली तर त्यावर 7.5% टक्के इतका व्याजदर मिळतो.
तसेच पाच वर्ष कालावधीसाठी जर एफडी केली तर त्या अंतर्गत आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा फायदा देखील मिळतो. ज्यांना त्यांच्या पैशांची बचत सुरक्षित ठेवून कर वाचवायचा असेल तर त्यांच्या करीता ही योजना फायदेशीर आहे.
पाच वर्षाच्या कालावधीत गुंतवणूक केली तर किती मिळू शकतो नफा?
तुम्हाला जर पोस्ट ऑफिस एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक करून जास्त पैसा मिळवायचा असेल तर पाच वर्षाचा कालावधी निवडणे उत्तम पर्याय आहे.
समजा यामध्ये तुम्ही पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला पाच वर्षानंतर साडेसात टक्के वार्षिक व्याज दराने सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतात. यामध्ये एकूण तुमची मुद्दल पाच लाख आणि त्यावर मिळणारे व्याज दोन लाख 24 हजार 974 रुपये होते.
पोस्ट ऑफिस एफडी योजनेमध्ये का गुंतवणूक करावी?
ज्या गुंतवणूकदारांना बँक एफडीपेक्षा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय हवा असेल त्यांच्यासाठी पोस्ट ऑफिस एफडी योजना एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस भारत सरकारद्वारे चालवल्या जातात व त्यामुळे गुंतवणूकदारांचे पैसे अगदी सुरक्षित राहतात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेतील जे काही व्याजदर आहेत ते स्पर्धात्मक आहेत. ज्यामुळे ते इतर बचत योजनांपेक्षा चांगले ठरतात. तसेच या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला हमी परतावा मिळतो आणि तुमचे पैसे सुरक्षित राहतात. तसेच करात सूट मिळाल्यामुळे ही योजना मध्यमवर्गीय कुटुंबासाठी योग्य आहे.