पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 2 लाख गुंतवा आणि 89,990 रुपये व्याज मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन

गुंतवणूक आणि समृद्ध असे आर्थिक भविष्य या एकमेकांशी निगडित अशा बाबी आहेत. यामध्ये जर बघितले तर भविष्यामध्ये समृद्ध असे आर्थिक जीवन जगण्यासाठी चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. परंतु गुंतवणूक करताना ती सुरक्षित आणि त्यापासून खात्रीशीर असा परतावा मिळेल हे देखील तितकेच गरजेचे असते.

Ajay Patil
Published:
post office fd scheme

Post Office Scheme:- गुंतवणूक आणि समृद्ध असे आर्थिक भविष्य या एकमेकांशी निगडित अशा बाबी आहेत. यामध्ये जर बघितले तर भविष्यामध्ये समृद्ध असे आर्थिक जीवन जगण्यासाठी चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे असते. परंतु गुंतवणूक करताना ती सुरक्षित आणि त्यापासून खात्रीशीर असा परतावा मिळेल हे देखील तितकेच गरजेचे असते.

या अनुषंगाने पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या योजना खूप फायद्याच्या ठरतात. अलीकडील काही वर्षापासून जर आपण बघितले तर पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप फायद्याच्या असून गुंतवणूकदारांकडून या योजनांना प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये जर बघितले तर पोस्ट ऑफिसची एफडी योजना खूप फायद्याचे असून एक उत्तम गुंतवणूक पर्याय म्हणून सध्या समोर आली आहे.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये आकर्षक व्याजदर आणि कर सुट इत्यादी फायदे देखील मिळतात. त्यामुळे तुम्ही जर सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट हा फायद्याचा पर्याय आहे.

काय आहेत पोस्ट ऑफिस एफडी योजनेचे वैशिष्ट्ये?
या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार त्यांच्या आर्थिक बजेट व सोयीनुसार एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष आणि पाच वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतो. ही योजना भारत सरकार द्वारे चालवली जाते व त्यामुळे त्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते. तुम्ही किती वर्षाच्या कालावधीसाठी ठेव ठेवत आहात त्यावर व्याजदर बदलत असतो.

सरकारच्या माध्यमातून वेळोवेळी यामध्ये सुधारणा देखील केली जाते. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत पाच वर्षाच्या कालावधीच्या गुंतवणुकीवर कर सवलत उपलब्ध आहे व कर बचतीच्या दृष्टिकोनातून अधिक आकर्षक बनवते.

कमीत कमी गुंतवणुकीपासून करता येते सुरुवात
पोस्ट ऑफिस एफडी स्कीममध्ये खाते उघडण्याकरिता किमान एक हजार रुपयांची आवश्यक आहे व यानंतर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची रक्कम 100 च्या पटीमध्ये वाढवू शकतात.

जास्तीत जास्त गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही व ही योजना मोठ्या आणि लहान गुंतवणूकदारांसाठी आदर्श योजना आहे. तसेच ही योजना तुम्ही एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करू शकतात.

किती आहे गुंतवणुकीवर व्याजदर?
पोस्ट ऑफिस योजनेमध्ये जर तुम्ही बघितले तर जास्तीच्या फायद्यासाठी किंवा जास्त व्याजदर मिळवण्यासाठी पाच वर्षांसाठी गुंतवणूक करणे सर्वात जास्त फायदेशीर ठरू शकते. या योजनेत पाच वर्षाच्या कालावधीसाठी 7.50% इतका व्याजदर दिला जातो.

तुम्ही जर पाच वर्षासाठी दोन लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला या योजनेच्या मॅच्युरिटीवर एकूण दोन लाख 89 हजार 990 रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या पाच लाखाच्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याजापोटी 89 हजार 990 रुपये मिळतात.

तसेच दोन वर्षाच्या कालावधी करिता जर तुम्ही दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर 7.10% इतका व्याजदर मिळतो व 29 हजार 776 रुपये इतके व्याज मिळते व मुद्दल आणि व्याज मिळून दोन लाख 29 हजार 776 रुपये मिळतात.

तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक कराल तितके जास्त व्याजाचा फायदा तुम्हाला मिळतो. जर आपण कालावधीनुसार बघितले तर एक वर्षाच्या ठेवीवर 6.90% इतका व्याजदर मिळतो.

तसेच दोन आणि तीन वर्षाच्या ठेवींवर 7.10 टक्के तर पाच वर्षाच्या ठेवीवर 7.50 टक्के इतका व्याजदर मिळतो. तसेच या योजनेत एका वर्षाच्या कालावधीसाठी दोन लाख रुपये जमा केले तर त्यावर 6.90% व्याजदराने 14,161 रुपये मिळतील व मुद्दल आणि व्याज मिळून दोन लाख 14 हजार 161 रुपये मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe