Post Office Scheme:- बहुसंख्य गुंतवणूकदार गुंतवणुकीकरिता प्रामुख्याने पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या मुदत ठेव योजना सारख्या योजनांना प्राधान्य देतात. या मागील प्रमुख कारण म्हणजे या दोन्ही पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित असते व परताव्याचे देखील निश्चित अशी हमी मिळते.
बँकांच्या योजनेच्या तुलनेत हल्ली काही वर्षांपासून पोस्टाच्या योजनांमध्ये देखील पैसे गुंतवण्याकडे गुंतवणूकदारांचा कल मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पोस्टाच्या सर्व योजना या सरकारी योजना असून त्यामुळे पैशांची गुंतवणुकीची सुरक्षितता जवळपास 100% पर्यंत आहे.
त्यामुळे पोस्टाच्या योजनांमध्ये जर सातत्याने आणि दीर्घ कालावधीपर्यंत तुम्ही गुंतवणूक करत राहिला तर तुम्हाला लाखो रुपयांमध्ये परतावा मिळणे शक्य आहे. जर आपण पोस्टाच्या योजनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ ही योजना खूप फायद्याची असून अवघ्या पाचशे रुपयांपासून तुम्ही या योजनेत गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात.
या योजनेत केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही एकूण पंधरा वर्षापर्यंत या योजनेत गुंतवणूक केली तर नक्कीच चांगला परतावा मिळतो.
या योजनेतील गुंतवणूक आणि मिळणाऱ्या परताव्याचे स्वरूप
पोस्टाची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजना ही दीर्घकालीन परताव्यासाठी उत्तम योजना म्हणून ओळखली जाते. समजा तुम्ही या योजनेमध्ये पन्नास हजार रुपये गुंतवले तर पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर ही योजना तुमच्या गुंतवलेल्या 50 हजाराचे तुम्हाला 14 लाख रुपये परताव्याच्या स्वरूपात देते.
इतकेच नाही तर तुम्ही जर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक सुरू केली तर एका वर्षात तुमचे 60 हजाराची रक्कम यामध्ये जमा होते व ही योजना मॅच्युअर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जवळपास व्याज आणि मुद्दल मिळून 16 लाख 27 हजार रुपये जमा होतात. अशाप्रकारे तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये गुंतवणूक करून देखील लाखो रुपयांचा परतावा या योजनेच्या माध्यमातून मिळवू शकतात.
काय आहेत पीपीएफ योजनेची वैशिष्ट्ये?
1- आपल्याला माहित असेलच की, पोस्टाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे वार्षिक व्याजदर हे सरकार ठरवत असते. त्यानुसार पीपीएफ योजनेचा सध्याचा व्याजदर हा 7.1 वार्षिक इतका आहे.
2- या योजनेमध्ये तुम्ही पंधरा वर्षे गुंतवणूक करू शकतात. जर तुम्हाला या कालावधीत वाढ करायची असेल तर तुम्ही 5-5 वर्षाच्या टप्प्यामध्ये ही योजना वाढवू शकतात.
3- इतकेच नाही तर या योजनेमध्ये तुम्ही जी गुंतवणूक करतात त्यावर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.
4- तसेच तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर्ज देखील मिळते. फक्त त्याकरिता अट अशी आहे की तुमच्या गुंतवणुकीच्या तिसऱ्या आणि सहाव्या महिन्यात तुम्हाला कर्ज घेण्याची सवलत दिली जाते.
5- ही योजना 100% हमी परतावा देणारी असून कर सवलत व त्यासोबत कर्ज घेण्यास देखील प्राधान्य देते. मुख्यत्वे या योजनेमध्ये कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ही योजना गुंतवणूकदारांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
6– या योजनेमध्ये तुम्ही एका वर्षात पाचशे रुपयांपासून ते कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करू शकतात.