Investment Tips : तुम्हालाही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची आहे का? हे 10 फंड ठरतील तुमच्यासाठी महत्त्वाचे

Ajay Patil
Published:

Investment Tips :- गुंतवणूक हा मुद्दा खूप महत्त्वाचा असून कष्टाने कमावलेला पैसा गुंतवणूक करताना तिची  सुरक्षितता आणि गुंतवणूक वर मिळणारा परतावा या दृष्टिकोनातून विचार करणे खूप गरजेचे असते. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असून आता बरेच जण शेयर बाजार तसेच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात.

यामध्ये जर आपण म्युच्युअल फंडाचा विचार केला तर यामध्ये गुंतवणूक सुरू करताना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर काळजी घेणे गरजेचे असते व माहिती असणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड असून ते देखील तुम्हाला माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये दहा महत्त्वाचे आणि  प्रसिद्ध असलेले म्युच्युअल  फंडची यादी पाहणार आहोत.

 गुंतवणुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या दहा म्युच्युअल फंडची यादी

इटी म्युच्युअल फंड्सने दहा आघाडीच्या आणि प्रसिद्ध असलेल्या म्युच्युअल फंड ची यादी तयार केली असून यामध्ये पाच वेगवेगळ्या इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणी मधून दोन योजनांची निवड केली आहे. यामध्ये हायब्रीड, लार्ज आणि मिडकॅप, स्मॉल कॅप आणि फ्लेक्सी कॅप गटातील आहेत. जे गुंतवणूकदार नियमितपणे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतात अशांसाठी ते महत्त्वाचे आहेत. यामध्ये जर आपण पाहिले तर…

कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड, मिरे एसेट लार्ज कॅप फंड, पराग पारीक फ्लॅक्सी कॅप फंड, यूटीआय फ्लॅक्सी कॅप फंड, ॲक्सिस मिडकॅप फंड, कोटक एमर्जिंग इक्विटी फंड, ॲक्सिस  स्मॉल कॅप फंड, एसबीआय स्मॉल कॅप फंड आणि एसबीआय इक्विटी हायब्रीड फंड इत्यादी फंडचा आपल्याला विचार करता येईल.या प्रत्येक फंडचे त्यांचे त्यांचे वैशिष्ट्य असून या योजनांमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

यामध्ये प्रत्येक श्रेणीबद्दल तुम्हाला अभ्यास करताना ते गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि याच्या मधील जोखीम तपासण्याकरिता तुम्हाला यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. जे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये नवीन गुंतवणूक करत आहेत अशांकरिता संकरित योजना अर्थात पूर्वीच्या संतुलित योजना किंवा इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड योजना महत्त्वाच्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून इक्विटी 65 ते 80 टक्के आणि डेट 20 ते 35 टक्के या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात. याच हायब्रीड पोर्टफोलिओमुळे ते केवळ इक्विटी योजनांपेक्षा तुलनेने कमी अस्थिर मानले जातात.

यामधील जर आपण अग्रेसिव्ह हायब्रीड स्कीमचा विचार केला तर हे गुंतवणुकीविषयी अत्यंत पुराणमतवादी असलेल्या गुंतवणूकदारांकरिता सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये अस्थिरता खूप कमी असते व दीर्घकालीन असेट निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. काही इक्विटी गुंतवणूकदार हे शेअर मध्ये देखील गुंतवणूक करतात. परंतु अशा ठिकाणी गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना सुरक्षितता हवी असते. अशा गुंतवणूकदारां करताच लार्ज कॅप योजना असतात. या योजना पहिल्या शंभर शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात आणि त्या इतर निव्वळ इक्विटी म्युच्युअल फंड योजना पेक्षा तुलनेने अधिक सुरक्षित असतात. तसेच अशा योजना मिडकॅप आणि स्मॉल कॅपपेक्षा कमी अस्थिर असतात.

तसेच जे गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये नियमितपणे  गुंतवणूक करतात  अशांकरता फ्लेक्सि कॅप म्युच्युअल फंड फायद्याचे ठरतात. जर आपण फंड मॅनेजरचा विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनावर आधारित या योजना बाजार भांडवलाने इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये नियमित गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या योजनांमध्ये गुंतवणूक करून कोणत्याही क्षेत्रातील स्टॉकच्या श्रेणीतील वाढीचा फायदा घेऊ शकतात. असेच काही गुंतवणूकदार ही जास्तीची जोखिम पत्करतात व जास्त परतावा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात अशांसाठी मिडकॅप आणि स्मॉल कॅप योजनांवर पैसे लावू शकतात.

मिडकॅप योजना साधारणपणे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि स्मॉल कॅप फंड बाजार भांडवलाच्या दृष्टीने लहान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. परंतु यांच्याकडे दीर्घ कालावधीकरिता चांगला परतावा देण्याची क्षमता असते. या गुंतवणूकदारांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची क्षमता आहे व अधिक जोखीम पत्करण्याची इच्छा आहे असे गुंतवणूकदार या प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe