itel ने आणला 7 दिवस बॅटरी बॅकअप देणारा फ्लिपफोन! फक्त 2499 रुपयांमध्ये मिळतील भन्नाट वैशिष्ट्ये

आयटेल या कंपनीने पहिला वहिला फ्लिप कीपॅड फोन Flip 1 लॉन्च केला असून हे डिवाइस क्लिक डिझाईन सह येतो आणि या फोनमध्ये 2.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

Ajay Patil
Published:
itel flip 1 phone

सध्या स्मार्टफोनचे युग असून अनेक कंपन्यांच्या माध्यमातून काही हजारांपासून तर लाखो रुपये किमतीचे असे अँड्रॉइड फोन लॉन्च केलेले आहेत. हे फोन दहा ते पंधरा हजारापासून ते लाख रुपये पर्यंत मिळतात. त्यामुळे ग्राहकांना देखील आता मोबाईल बाजारपेठेमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने प्रत्येक जण आपला  बजेटमध्ये उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन विकत घेण्याचा प्लान करत असतो.

या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळी वैशिष्ट्य असलेले उत्तम असे स्मार्टफोन लॉन्च करण्यात आलेले आहेत. या सगळ्या स्पर्धेमध्ये मात्र आयटेल या कंपनीने पहिला वहिला फ्लिप कीपॅड फोन Flip 1 लॉन्च केला असून हे डिवाइस क्लिक डिझाईन सह येतो

आणि या फोनमध्ये 2.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या फोनच्या मागच्या बाजूला VGA कॅमेरा देण्यात आला आहे व या फोनमध्ये 1200mAh ची बॅटरी देखील देण्यात आलेली आहे व त्यामुळे याला उत्तम बॅटरी बॅकअप मिळण्यास मदत होणार आहे.

Itel ने लॉन्च केला पहिला फ्लिप कीपॅड फोन

Itel ने फीचर फोन बाजारात फ्लिप 1 लॉन्च केला असून हा डिवाइस स्लिक डिझाईनसह येतो. यामध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून या फोनच्या मागे VGA कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे.

तसेच उत्तम बॅटरी बॅकअप करिता या फोनमध्ये  1200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे व कंपनीने बॅटरी बॅकअप बद्दल दावा केला आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर सात दिवसापर्यंत चा बॅकअप मिळू शकतो.

तसेच या फोनमध्ये ब्लूटूथ ला सपोर्ट देण्यात आला असून यामध्ये प्रीमियम टच देण्याकरिता बॅक पॅनलवर लेदर डिझाईन देण्यात आली आहे.

 किती आहे आयटेल फ्लिप 1 ची किंमत?

itel फ्लिप 1 ची किंमत 2499 रुपये ठेवण्यात आली असून या कमीत कमी किमतीत देखील या फोन सोबत 12+1 महिन्याची वारंटी देखील देण्यात आलेली आहे. या फोनमध्ये 2.4- इंचाचा OVGA डिस्प्ले मिळतो व व्हिजीए कॅमेराचा समावेश आहे. या फोनमध्ये मागील लेदर डिझाईन देण्यात आली असून हा फोन लाईट वेट आहे आणि स्लिक बिल्डसह येतो.

या फोनमध्ये कीपॅडच्या वर ग्लास फिनिश मिळते व विशेष म्हणजे बारा भारतीय भाषांचा सपोर्ट यामध्ये देण्यात आलेला आहे. सध्या हा फोन तीन रंगात उपलब्ध होणार आहे व यामध्ये किंग व्हाईस फीचर्स देखील देण्यात आले असून ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करतो.

चार्जिंग करिता टाईप सी पोर्ट देण्यात आला असून तुम्ही कुठल्याही टाईप सी केबलने याला चार्जिंग करू शकतात. तसेच यामध्ये एक नॉन रिमुव्हेबल बॅटरी देखील देण्यात आलेली आहे. कंपनीने दवा केला आहे की, हा फोन फुल चार्जमध्ये सात दिवसापर्यंतचा बॅकअप आरामात देऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe