अरे वा! जिओने आणला धमाकेदार प्लान; फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये मिळेल तुम्हाला एक वर्षाकरिता अनलिमिटेड 5G डेटा, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

जिओचा ग्राहक वर्ग जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते व यामागील प्रमुख कारण म्हणजे जिओच्या माध्यमातून इतर दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्ज प्लान पेक्षा स्वस्तात असे अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध असल्याने आणि सेवेच्या बाबतीत देखील इतरांपेक्षा सरस असल्याने भारतातील जिओ युजर्सची संख्या मोठी असल्याचे आपल्याला दिसून येते.

Ajay Patil
Updated:
jio data plan

Affordable Jio Data Plan:- भारतामधील जर आपण दूरसंचार कंपन्या बघितल्या तर यामध्ये व्हीआय, एअरटेल व त्यासोबत जिओ नेटवर्कचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु या सगळ्यांमध्ये जिओचा ग्राहक वर्ग जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते व यामागील प्रमुख कारण म्हणजे जिओच्या माध्यमातून इतर दूरसंचार कंपन्यांच्या रिचार्ज प्लान पेक्षा स्वस्तात असे अनेक रिचार्ज प्लान उपलब्ध असल्याने आणि सेवेच्या बाबतीत देखील इतरांपेक्षा सरस असल्याने भारतातील जिओ युजर्सची संख्या मोठी असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे तुमचे काम जर मोबाईल डेटावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असेल तर तुमच्याकरिता जिओ नेटवर्क किंवा जिओचा डाटा हा फायद्याचा ठरेल. तुम्ही जर जिओ युजर्स असाल तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर जिओच्या माध्यमातून लॉन्च करण्यात येत असलेल्या अनेक नवनवीन व चांगल्यात चांगले प्लानचा फायदा घेऊ शकतात व कमीत कमी किमतीत अधिक डेटा प्लान मिळू शकतात.

अगदी याच अनुषंगाने जर आपण जिओचा एक नवीन रिचार्ज प्लान बघितला तर तो खूप फायद्याचा असून यामध्ये तुम्हाला सहाशे एक रुपयाच्या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटाचा लाभ मिळू शकतो.

कसा आहे जिओचा 601 रुपयांचा प्लान?
जिओच्या सहाशे एक रुपये प्लान बद्दल जर आपण सविस्तर माहिती घेतली तर या प्लॅनचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला यामध्ये दररोज दोन जीबी डेटा मिळतो व याच प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील तुम्हाला मिळतो व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिओचे युजर्स एक वर्षाकरिता अनलिमिटेड 5G डेटाचा देखील लाभ या माध्यमातून घेऊ शकतात.

या प्लानमध्ये वापरकर्त्याला बारा डेटा व्हाउचर मिळतात व व्हाऊचरची किंमत 51 रुपये आहे व या प्लानमध्ये वापरकर्ते आता डेली 1.5 जीबी डेटा असलेल्या प्लॅनमध्ये देखील अनलिमिटेड 5G डेटाचा फायदा घेऊ शकतात. हा एक जिओचा डेटा वाउचर प्लान असून एक वर्षासाठी वापरला जाऊ शकतो.

परंतु या प्लानचा वापर तेच युजर्स करू शकतात ज्या युजर्सकडे 5G स्मार्टफोन आहे आणि राहत असलेल्या भागांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे. तसेच हा प्लॅन वापरण्याकरिता युजर्सकडे आधीपासून ॲक्टिव्ह प्लान असणे आवश्यक आहे.

तसेच जिओने 11 रुपयाचा एक नवीन डेटा प्लान आणला असून एका तासासाठी यामध्ये दहा जीबी डेटा ऑफर केला जातो. हा जिओचा डाटा लाईनअप मधील सर्वात स्वस्त रिचार्ज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe