अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- पूर्व रेल्वेने कोविड -19 महामारीच्या विरूद्ध लढा म्हणून पॅरा मेडिकल स्टाफ अर्थात (रिसेप्शनिस्ट) / सीएमपी म्हणजेच (फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट आणि विविध तज्ञ / नॉन-विशेषज्ञ) पदासाठी भरती काढली आहे.
सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यासाठी रेल्वेने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. देशातील आणि वर्कशॉप रेल्वे रूग्णालय / पूर्व रेल्वे / कंचारारा येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
त्यामुळे पूर्व रेल्वेलाही नव्या लोकांची गरज आहे. आपल्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळण्याची संधी देखील आहे. या पदांवर रेल्वे 95000 रुपयांपर्यंत पगार देईल.
थेट मुलाखत घेईल :- सर्व उमेदवारांना 27 मे आणि 28 मे 2021 रोजी वाक-इन इंटरव्यू तीसाठी हजर राहावे लागेल. एकूण 18 पदांवर भरती घेण्यात येईल. यामध्ये स्पेशलिस्टसाठी 10 पदे, नॉन-स्पेशलिस्टसाठी 4 आणि रिसेप्शनिस्टसाठी 4 पदांचा समावेश आहे.
क्वालिफिकेशन :-
- स्पेशलिस्ट : संबंधित विषयात एमडी/डीएनबी/एमआरसीपी
- नॉन-स्पेशलिस्ट : सीएमपीसाठी एमबीबीएस (नॉन-स्पेशलिस्ट); उमेदवाराने अनिवार्य रोटरी इंटर्नशिप पूर्ण केली असावी
- रिसेप्शनिस्ट : उमेदवार इंग्रजी, बंगाली आणि हिंदी भाषा आणि संगणक / आयटी एप्लीकेशन चे मूलभूत ज्ञान असलेले पदवीधर असावे.
वयोमर्यादा :-
- सीएमपी (स्पेशलिस्ट / नॉन-स्पेशलिस्ट) : उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 65 वर्षांपेक्षा जास्त नसावी
- रिसेप्शनिस्ट :अर्जदाराचे वय 22 ते 35 वर्षांदरम्यान असावे
पगार किती मिळेल ? :-
- सीएमपी (स्पेशलिस्ट) : 95,000 रुपये
- सीएमपी (नॉन-स्पेशलिस्ट) : 75,000 रुपये
कसा करावा अर्ज ? :- उमेदवार कागदपत्रांसह मुख्य वैद्यकीय अधीक्षक, ईआर / केपीएच्या कार्यालयात 27 मे आणि 28 मे 2021 रोजी वॉक-इन-मुलाखतीत उपस्थित राहू शकतात. अधिक माहितीसाठी आपण या लिंकवर जाऊ शकता.
(https://er.indianrailways.gov.in/cris//uploads/files/1621417693736-Notification%20CMP%20&%20Receptionist.pdf). अधिक माहितीसाठी सर्व उमेदवार पूर्व रेल्वेची अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम