लॉन्च झाली Honda ची शानदार स्कूटी, फीचर्सपासून किंमतीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-ACTIVA 6Gच्या यशानंतर होंडा मोटरसायकल व स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एचएमएसआय) ने आता आणखी एक स्कूटर मॉडेल एडिशन बाजारात लॉन्च केली आहे. ही Grazia स्कूटरची स्पोर्ट्स एडिशन आहे.

किंमत काय आहे:- कंपनीने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या राजधानी दिल्लीत या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 83 हजार 140 रुपये आहे. एचएमएसआयने निवेदनात म्हटले आहे की, या एडिशन मध्ये 125 सीसी भारत स्टेज-सहा सुसंगत इंजिन आहे. यात कंपनीने साइड स्टँड इंडिकेटरसह अनेक नवीन वैशिष्ट्ये दिली आहेत.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, आत्सुशी ओगाता म्हणाले की, गेल्या 20 वर्षात होंडाने स्कूटर बाजाराचे नूतनीकरण केले. ग्रेजियाची नवीन एडिशन प्रीमियम स्कूटर या कॅटेगिरीस अधिक आकर्षक बनवेल. या स्कूटरची इंधन टाकी क्षमता 5.3 लीटर आहे.

त्याची सीट लेंथ 708 मिमी आहे, तर लांबी 1829 मिमी, रुंदी 707 मिमी, उंची 1167 मिमी आहे. कंपनीने ग्रॅझियाची नवीन स्पोर्ट्स एडीशन दोन रंगात (काळा आणि लाल) बाजारात आणली आहे. यात पावरसाठी फॅन-कूल्ड, 4-स्ट्रोक, एसआय इंजिन आहे. त्याचे इंजिन स्वयंचलित (व्ही-मॅटिक) ट्रांसमिशन सह सुसज्ज आहे.

दरम्यान, होंडाची पूर्वीची भागीदार कंपनी, हीरो मोटर्स या कंपनीने युके ट्रान्समिशन डिझाईन तंत्रज्ञान कंपनी हॅव्हलँड अभियांत्रिकीमध्ये रणनीतिक हिस्सेदारी घेतली आहे, अद्याप कंपनीने या कराराची रक्कम उघड केली नाही.

हीरो मोटर्स कंपनीने (एचएमसी) एका निवेदनात म्हटले आहे की हे अधिग्रहण उत्तर अमेरिका, युरोप आणि भारतातील जलद उदयोन्मुख इलेक्ट्रिक वाहन श्रेणीतील उच्च प्रतीचे ट्रान्समिशन उत्पादने उपलब्ध करण्यास मदत करेल.