LIC Credit Card:- सध्या क्रेडिट कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक बँकांच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी जारी केली जातात.सध्या ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढल्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला सध्या दिसून येते.
याच अनुषंगाने विमा क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी चा विचार केला तर विविध प्रकारच्या विमा सुविधा पुरवणाऱ्या एलआयसीने देखील आता क्रेडिट कार्ड लॉन्च केले असून या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

एलआयसीने हे क्रेडिट कार्ड एलआयसी कार्ड्स, मास्टर कार्ड आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने लॉन्च केलेले आहे. या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्हाला मोफत वैयक्तिक अपघाती विमा देखील मिळणार आहेत व यासोबतच अनेक प्रकारचे फायदे ग्राहकांकरिता ऑफर करण्यात आलेले आहेत. याच अनुषंगाने या लेखांमध्ये नेमके एलआयसी क्रेडिट कार्ड कसे आहे व त्याचे फायदे काय आहेत? इत्यादी बद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
एलआयसीने लॉन्च केले पैसा वसूल क्रेडिट कार्ड?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विमा क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एलआयसीने मास्टर कार्ड, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एलआयसी कार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने दोन प्रकारचे क्रेडिट कार्ड लॉन्च केले असून त्यातील पहिले म्हणजे एलआयसी सिलेक्ट आणि दुसरे म्हणजे एलआयसी क्लासिक ही होय. या क्रेडिट कार्ड मध्ये कमीत कमी व्याजदर व झिरो जॉइनिंग फी आणि रिवार्ड पॉईंट्ससह अनेक प्रकारचे फायदे आणि ऑफर देण्यात आलेले आहेत. या दोन्ही कार्डांचे वेगवेगळे फायदे असून त्यातील….
एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्डचे वैशिष्ट्ये
1- तुम्ही जर हे क्रेडिट कार्ड घेतले तर यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जॉइनिंग फी किंवा वर्षाला काही शुल्क भरण्याची गरज नाही.
2- क्लासिक क्रेडिट कार्डचे व्याजदर पाहिले तर प्रत्येक महिन्याला 0.75 टक्के किंवा नऊ टक्के प्रति वर्ष यापासून सुरू होतात. प्रत्येक महिन्याचा विचार केला तर ते साडेतीन टक्के किंवा वर्षाला 42% पर्यंत जाऊ शकतात.
3- समजा तुम्ही जर या क्लासिक क्रेडिट कार्डचा पैसे काढण्यासाठी वापर केला तर देशामध्ये आणि विदेशात एटीएमच्या माध्यमातून 48 दिवसापर्यंत पैसे काढण्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारची व्याज यावर लागत नाही.
4- या कार्डच्या माध्यमातून जर तुम्ही ईएमआय भरत असाल तर प्रत्येक व्यवहाराकरिता तुम्हाला 199 रुपये इतके चार्जेस लागतील.
5- तुम्ही वेळेवर पेमेंट केले तर तुमच्या अंतिम रकमेच्या 15% म्हणजेच कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त बाराशे पन्नास रुपये भरावे लागतील.
काय आहेत क्लासिक क्रेडिट कार्डचे फायदे?
हे कार्ड तयार झाल्यावर पासून तीस दिवसांच्या आत जर पहिले पाच हजार रुपये खर्च केले तर तुम्हाला १००० रिवार्ड पॉईंट मिळतील तसेच त्यासोबत पाच टक्के कॅशबॅक( एक हजार रुपये पर्यंत ) कार्ड निर्मितीच्या तीस दिवसांच्या आत केलेल्या पहिल्या ईएमआयच्या व्यवहार मूल्यावर उपलब्ध असेल.
जर तुम्ही देशांतर्गत फ्लाईट बुक केली तर तुम्हाला पाचशे रुपयांचे सूट मिळेल. एवढेच नाही तर तुम्हाला MYGLAMM वर 899 रुपये आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर रुपये 500 ची सूट मिळेल. फार्म इझी प्लस सबस्क्रीप्शन हे 399 रुपयांचे असून ते तुम्हाला मोफत मिळेल. एवढेच नाही तर पाचशे रुपयांची एक वर्षासाठीची मोफत लेन्स कार्ट गोल्ड मेंबरशिप देखील मिळेल.
एलआयसी क्लासिक क्रेडिट कार्डचे विमा फायदे
एलआयसीच्या क्लासिक क्रेडिट कार्डवर गेल्या 30 दिवसात कमीत कमी एक व्यवहार केला तर कमीत कमी दोन लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा कव्हर व कार्ड हरवले तर 25000 रुपयांचे लायबिलिटी कव्हर देखील मिळेल. त्यासोबतच तुम्हाला परचेस प्रोटेक्शन कव्हर, क्रेडिट शिल्ड आणि हरवलेल्या क्रेडिट कार्ड लायबिलिटी वर प्रत्येकी 25 हजार रुपयांचे कव्हर उपलब्ध असणार आहे.
एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्डचे वैशिष्ट्ये
एलआयसी ने लॉन्च केलेल्या क्रेडिट कार्ड चा दुसरा प्रकार म्हणजे सिलेक्ट क्रेडिट कार्ड होय. यावर देखील तुम्हाला कुठल्याही प्रकारची जॉइनिंग आणि वार्षिक फी भरण्याची गरज नाही. या क्रेडिट कार्डचे व्याजदर प्रतिमाह 0.75 टक्के किंवा प्रति वर्ष नऊ टक्के पासून सुरू होतील व ते दरमहा साडेतीन टक्के किंवा प्रति वर्ष 42% पर्यंत जाऊ शकतील.
तुम्ही जर रोख कॅश काढली तर तुम्हाला 48 दिवसांकरिता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय एटीएममध्ये कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. क्लासिक क्रेडिट कार्ड प्रमाणेच तुम्हाला सिलेक्ट क्रेडिट कार्डवर देखील ईएमआय करिता प्रत्येक व्यवहारावर 199 रुपयांचे चार्जेस देणे गरजेचे आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डचे पेमेंट लेट केले तर तुम्हाला पंधरा टक्के भरावे लागतील.
एलआयसी सिलेक्ट क्रेडिट कार्डचे फायदे
हे कार्ड तयार झाल्यापासून 30 दिवसांच्या आत मध्ये पहिले दहा हजार रुपये खर्च केल्यावर तुम्हाला दोन हजार रिवॉर्ड पॉइंट मिळतील व कार्ड निर्मितीच्या 30 दिवसांच्या आत पहिला ईएमआय व्यवहार केला तर पाच टक्के कॅशबॅक म्हणजेच एक हजार रुपये पर्यंत तुम्हाला कॅशबॅक मिळेल.
देशांतर्गत फ्लाईट बुक केली तर पाचशे रुपयांची सूट मिळेल. पाचशे रुपयांची मोफत एक वर्षाची लेन्स कार्ड गोल्ड मेंबरशिप व प्रतीमाह दोन मोफत डोमेस्टिक विमानतळ लाऊंज प्रवेश मिळेल. बाकीचे फायदे हे क्लासिक क्रेडिट कार्ड सारखेच आहेत.
एलआयसी क्रेडिट कार्ड विमा फायदे
तीस दिवसांमध्ये कमीत कमी एक व्यवहार केला तर पाच लाख रुपयांचे वैयक्तिक अपघाती विमा कव्हर आणि कार्ड हरवले तर 50 हजार रुपयांचे लायबिलिटी कव्हर या कार्डवर मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला परचेस प्रोटेक्शन कव्हर, क्रेडिट शिल्ड आणि चेक इन बॅगेज हरवणे किंवा उशीर होणे,
पासपोर्ट आणि इतर कागदपत्र हरवणे आणि विमानाच्या उड्डाणाला जर विलंब झाला तर याकरिता चार हजार रुपयांचे प्रवास विमा संरक्षण देखील उपलब्ध असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एक कोटी रुपयांचा तुम्हाला हवाई अपघात विमा देखील मिळणार आहे.