LIC Policy:- गुंतवणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे गुंतवणुकीचे पर्याय सध्या उपलब्ध असून यामध्ये चांगला परतावा देणाऱ्या आणि गुंतवणूक सुरक्षित राहणाऱ्या पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार हे गुंतवणूक करत असतात.
यात प्रामुख्याने विविध बँकांच्या मुदत ठेव योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना तसेच बऱ्याच सरकारी योजनांचा यामध्ये आपल्याला समावेश करता येईल. याशिवाय लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असून या एलआयसीच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना सादर करण्यात आलेल्या आहेत
व त्या माध्यमातून विविध वयोगटातील व्यक्ती या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. एलआयसीचे अनेक फायदेशीर प्लान असून त्यातीलच एक मुलींसाठी महत्त्वाच्या असलेल्या एलआयसीच्या प्लान बद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
एलआयसीची कन्यादान पॉलिसी
एलआयसीची ही योजना मुलींसाठी खूप महत्त्वाची असून या योजनेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलींचे शिक्षण आणि लग्नाच्या चिंतेपासून मुक्तता मिळवू शकतात. कन्यादान पॉलिसी असे या योजनेचे नाव आहे व या योजनेत तुम्हाला दररोज फक्त 151 रुपयांचे गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
या योजनेचा कालावधी 13 ते 25 वर्षाचा असून प्रामुख्याने कन्यादान पॉलिसी ही पंचवीस वर्षांकरिता आहे. विशेष म्हणजे याकरिता तुम्हाला फक्त 22 वर्षे प्रीमियम भरावा लागतो आणि पुढील तीन वर्षांकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रीमियम भरावा लागत नाही. तसेच तुम्ही ही पॉलिसी 17 वर्षांपर्यंत देखील घेऊ शकता.
कन्यादान पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
या पॉलिसी करिता मुलीचा जन्माचा दाखला, पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे लागतात
दरदिवशी 151 रुपये गुंतवणे गरजेचे
एलआयसीच्या या कन्यादान पॉलिसीमध्ये तुम्ही दररोज 151 रुपये गुंतवल्यास प्रत्येक महिन्याला तुमचे 4530 रुपये जमा होतात. अगदी दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला पगार असेल तरी देखील तुम्ही आरामात ही पॉलिसी विकत घेऊ शकतात.
परंतु तुम्हाला 22 वर्षे सतत यामध्ये प्रीमियम भरणे गरजेचे आहे. त्यानंतर पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 31 लाख रुपयांचा फायदा या माध्यमातून मिळतो.
या पद्धतीने घेऊ शकता ही पॉलिसी
तुम्हाला जर एलआयसी कन्यादान पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात किंवा तुमच्या परिसरात राहणाऱ्या एलआयसी एजंट च्या माध्यमातून देखील ही पॉलिसी घेऊ शकता.