LIC New Scheme : LIC ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. LIC कडून अनेक योजना राबवल्या जातात, ज्या लोकांच्या फायद्याच्या आहेत. LIC नेहमीच नवनवीन योजना आणत असते. अशातच LIC ने आणखी एक प्लॅन आणला आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना लोनसह अनेक सुविधा मिळतात. चला LIC च्या या प्लॅनबद्दल जाणून घेऊया.
LIC चा हा नवा प्लान २९ नोव्हेंबरला लाँच झाला आहे. या नवीन योजनेचे नाव LIC जीवन उत्सव योजना 871 आहे. ही एक पारंपारिक योजना आहे, याचा अर्थ ती बाजाराशी संबंधित नाही. जीवन उत्सव 871 विमा, बचत आणि पेन्शन यांचे संयोजन आहे.

LIC ची जीवन उत्सव योजना 871 ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटेड, वैयक्तिक, बचत, जीवन विमा योजना आहे. ही एक मर्यादित प्रीमियम योजना आहे ज्यामध्ये प्रीमियम पेमेंट कालावधी दरम्यान हमी दिलेले अतिरिक्त फायदे समाविष्ट आहेत.
मर्यादित प्रीमियम पेमेंट पर्याय
एलआयसी जीवन उत्सव 871 मुदतपूर्तीपूर्वी मृत्यू पावलेल्या पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करते. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये मर्यादित प्रीमियम पेमेंटचा पर्याय आहे. संपूर्ण जीवन पॉलिसीच्या अटींसाठी प्रीमियम पेमेंट टर्म 5 वर्षे ते 16 वर्षे आहे.
एलआयसी जीवन उत्सव योजनेचे फायदे :-
-18 वर्षे ते 100 वर्षे आयुष्यासाठी हमी उत्पन्न.
-नियमित उत्पन्न लाभ किंवा फ्लेक्सी उत्पन्न लाभ निवडण्याचा पर्याय.
-पॉलिसीच्या प्रारंभाच्या वेळी सर्व फायद्यांची हमी दिली जाईल.
-लाभ देण्याच्या सहा महिन्यांनी तुम्ही मिळकत लाभाचा प्रकार बदलू शकता.
-प्रीमियम पेमेंट टर्म पर्याय फक्त 5 वर्षे ते 16 वर्षे.
-ही पॉलिसी ९० दिवसांच्या मुलापासून ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीसाठी घेतली जाऊ शकते.
-डेथ बेनिफिट मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105 टक्क्यांपेक्षा कमी नसेल.
-‘मृत्यूवर विमा रक्कम’ ची व्याख्या ‘मूलभूत विमा रक्कम’ किंवा ‘वार्षिक प्रीमियमच्या 7 पट’ म्हणून केली जाते.
-LIC जीवन उत्सव योजना 871 अंतर्गत किमान 2 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर कर्जाची सुविधा उपलब्ध आहे.
-किमान 2 वर्षांचा प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी सरेंडर केली जाऊ शकते.