LIC Pension Scheme : निवृत्तीनंतर आरामात आणि मनासारखे आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक फार महत्वाची आहे, तुम्ही तुमच्या निवृत्तीचा विचार करून आतापासून गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर जगणे फार सोपे होऊन जाईल. खाजगी क्षेत्रात काम करणार्यांना त्यांच्या निवृत्तीची सर्वात जास्त चिंता असते.
अशा परिस्थितीत लोक बचतीसाठी विविध प्रकारचे नियोजन करू लागतात. परंतु बचत केल्याने निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळत नाही. नियमित उत्पन्नासाठी देशात अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC जोमाने काम करत आहे. एलआयसीकडे सर्व श्रेणींसाठी पॉलिसी योजना आहेत. या योजनांच्या मदतीने तुम्ही तुमच्या भविष्यासाठी उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत.

आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत, त्याचे नाव सरल पेन्शन योजना, या योजनेद्वारे तुम्ही सेवानिवृत्तीसाठी भरपूर पैसे जमा करू शकता. आणि भविष्यात चिंतामुक्त राहू शकता.
LIS सरल पेन्शन योजना काय आहे?
एलआयसी सरल पेन्शन योजनेअंतर्गत, दरमहा 12,000 रुपये पेन्शन उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकदाच प्रीमियम भरावा लागतो आणि त्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी पासून तुम्हाला 12,000 रुपये पेन्शन मिळत राहते. या पेन्शनचा लाभ तुम्हाला आयुष्यभर मिळतो. तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 58,950 रुपये पेन्शन मिळेल. हे पेन्शन गुंतवणूक खात्यावर अवलंबून असते.
सरल पेन्शन योजनेसाठी असा करा अर्ज
जर तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही या पेन्शन योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. या योजनेत दरवर्षी किमान 12,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. ही योजना 40 ते 80 वयोगटातील लोकांसाठी आहे. पॉलिसीधारकाला ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर कधीही कर्जाचा लाभ मिळेल.
भारतीय आयुर्विमा महामंडळ. ही भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे आणि देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी आहे. ती पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे. त्याची स्थापना 1956 साली झाली.













