LIC Plans : एलआयसीच्या ‘या’ योजनेत पॉलिसी धारकांना मिळेल दुहेरी फायदा; बचतीसह जीवन विम्याचा लाभ; वाचा सविस्तर…

Sonali Shelar
Published:
LIC Plans

LIC Plans : गुंतवणुकीचे अनेक पर्याय असूनही, आजही अनेकांचा भारतीय आयुर्विमा महामंडळावर विश्वास आहे. एलआयसी आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना आणत असते. अशातच LIC ने काही दिवसांपूर्वी एक नवीन टर्म प्लॅन ‘जीवन किरण योजना’ लाँच केली होती.

ही एक नॉन-लिंक्ड, वैयक्तिक बचत आणि जीवन विमा योजना आहे. पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास ही योजना कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. दुसरीकडे, तुम्ही एका ठरावीक वयापर्यंत जिवंत राहिल्यास भरलेली एकूण प्रीमियम रक्कम परत केली जाते.

जीवन किरण योजनेचे वैशिष्ट्ये

या योजनेमध्ये धूम्रपान करणारे आणि धूम्रपान न करणाऱ्या दोघांसाठी वेगवेगळे प्रीमियम दर आहेत. या पॉलिसी अंतर्गत किमान मूळ विमा रक्कम 15 लाख रुपये ठेवण्यात आली आहे आणि कमाल मूळ विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही. या पॉलिसीची किमान मुदत 10 वर्षे आणि कमाल मुदत 40 वर्षे आहे. यात प्रीमियम एकरकमी भरता येतो. तसेच तुम्ही प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पर्याय देखील निवडू शकता.

यासाठी कोण अर्ज करू शकतो?

ही योजना नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपिंग प्लॅन 18 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. एलआयसीच्या मते, ही पॉलिसी प्रीमियमच्या परताव्यासह जीवन संरक्षण देते. पॉलिसीची मुदत 10 वर्षे ते 40 वर्षांपर्यंत असते.

प्रीमियम किती असेल?

नियमित प्रीमियम पॉलिसींसाठी किमान हप्ता प्रीमियम 3,000 रुपये आहे तर सिंगल प्रीमियम पॉलिसींसाठी किमान रक्कम 30,000 रुपये आहे. त्याच वेळी, धूम्रपान न करणाऱ्या आणि धूम्रपान करणाऱ्यांसाठी प्रीमियम दर वेगेवेगळे आहेत. प्रीमियम सिंगल प्रीमियम किंवा नियमित प्रीमियमद्वारे भरला जाऊ शकतो. त्याच वेळी, 50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सारणी प्रीमियमवर सूट देखील उपलब्ध आहे.

पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास काय होईल?

पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो तर परिपक्वतेपर्यंत जिवंत राहिल्यास, भरलेले एकूण प्रीमियम परत केले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe