शेडनेट उभारा आणि 3 लाख 55 हजार रुपये अनुदान मिळवा! वाचा किती आकारमानाच्या शेडनेटला प्रतीचौरस खर्च व किती मिळते अनुदान?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेती जर आधुनिक पद्धतीने करायची असेल व त्यामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करणे खूप गरजेचे असते. परंतु याकरिता सगळ्यात अगोदर लागतो तो पैसा. कारण आधुनिक शेती किंवा आधुनिक पीक पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर याचा अवलंब करताना शेतकऱ्यांना पैसा लागणारच आहे.

त्यामुळे पैशांच्या अभावी शेतकरी मागे राहू नये म्हणून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजनांची आखणी करण्यात आलेली असून त्यांची अंमलबजावणी देखील केली जात आहे. अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते व त्यामुळे शेतकऱ्यांना अशा सोयी सुविधा उभ्या करताना सोपे जाते व आर्थिक पाठबळ देखील मिळते.

अगदी याच पद्धतीने जर आपण विचार केला तर संरक्षित शेतीच्या दृष्टिकोनातून शेडनेटला खूप मोठे महत्त्व आहे. तापमान नियंत्रित करून कुठलेही पीक तुम्हाला बारमाही घ्यायचे असेल तर शेडनेट हा एक चांगला पर्याय आहे. परंतु जर आपण शेडनेट उभारणीचा खर्च पाहिला तर तो खूप जास्त असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला शेडनेट उभारणे शक्य होत नाही. हीच समस्या डोळ्यासमोर ठेवून शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या माध्यमातून शेडनेट हाऊस करिता अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते.

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट हाऊस अनुदानाकरिता आवश्यक कागदपत्रे

जर तुम्हाला देखील एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेडनेट हाऊस करिता अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना अर्ज करताना काही कागदपत्रांची आवश्यकता भासते. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याला अर्ज करताना सातबारा उतारा तसेच आठ अ चा नमुना,आधार कार्ड, आधार संलग्न असलेले राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित अर्थात झेरॉक्स प्रत, हमीपत्र, तसेच लाभार्थी शेतकरी जर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील तर त्यांच्याकरिता संवर्ग प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला असणे गरजेचे आहे.

 शेडनेटच्या आकारमानानुसार प्रति चौरस मीटर खर्च मिळणारे अनुदान

1- एक हजार आठ चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटकरिता शेडनेटचे आकारमान जर 1008 चौरस मीटर असेल तर एकूण प्रकल्प खर्च हा प्रति चौरस मीटर 742 इतका असून याकरिता तीन लाख 55 हजार रुपये अनुदान मिळते.

2- 2048 चौरस मीटर आकारमानाचे शेडनेट शेडनेटचे आकारमान जर 2048 चौरस मीटर असेल तर त्यासाठीचा प्रकल्प खर्च हा प्रतिचौरस मीटर करिता 710 रुपये इतका असून याकरिता मिळणाऱ्या अनुदान हे सात लाख दहा हजार इतके आहे.

3- 3 हजार 40 चौरस मीटर आकाराच्या शेडनेटकरिता तीन हजार 40 चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटसाठीचा प्रकल्प खर्च हा 710 रुपये प्रति चौरस मीटर असून याकरिता मिळणारे अनुदान हे दहा लाख 65 हजार इतके आहे.

4- चार हजार चौरस मीटर आकारमानाच्या शेडनेटकरिता चार हजार चौरस मीटर आकाराच्या शेडनेट करिता एकूण प्रकल्प खर्च हा 710 रुपये प्रति चौरस मीटर असून याकरिता 14 लाख 20 हजार रुपये अनुदान देय आहे.

यामध्ये महत्त्वाचे म्हणजे १००८ चौरस मीटर शेडनेट उभारणीसाठी प्रकल्प खर्च हा 742 रुपये प्रति चौरस मीटर असून रुपये सातशे दहा ग्राह्य धरण्यात येणार आहे. उर्वरित खर्च प्रति चौरस मीटर 34 रुपये हा लाभार्थ्याला स्वतः करणे गरजेचे आहे. सदर बाबींकरिता कमाल अनुदान हे तीन लाख 55 हजार रुपये देण्यात येईल.

 अर्ज कुठे कराल?

शेडनेट हाऊस अनुदाना करिता अर्ज करायचा असेल तर mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकता.

 अधिक माहितीसाठी इथे साधा संपर्क

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा.