LIC Policy:- भविष्यकालीन आर्थिक समृद्धी किंवा आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक तुम्हाला खूप गरजेचे असते व गुंतवणूक करताना ती सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये करणे फार महत्त्वाचे असते. कारण गुंतवणूक हे आपल्या भविष्यातील अनेक आर्थिक गरजांसाठी खूप महत्त्वाचे ठरते व तुम्ही बचत करून केलेली गुंतवणूक तुमचा भविष्यकाळ आर्थिक दृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
अगदी हीच बाब मुलांच्या भविष्याबद्दल देखील लागू होते. आज जन्माला आलेल्या मुलांसाठी येणाऱ्या भविष्यकाळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करावा लागतो व हा पैसा प्रामुख्याने त्यांचे शिक्षणावर होत असतो. त्यामुळे आतापासून एखाद्या चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून मुलांचे आर्थिक दृष्टिकोनातून भविष्य सुरक्षित करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.
या अनुषंगाने एलआयसी ने एक पाऊल पुढे टाकले असून लहान मुलांसाठी एक नवीन योजना काही दिवसांअगोदर लॉन्च केली व या योजनेचे नाव आहे एलआयसी अमृत बल पॉलिसी होय. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला विमा संरक्षण तर मिळतेच परंतु उत्कृष्ट परतावा देखील मिळतो.
मुलांच्या उज्वल भविष्यासाठी एलआयसी अमृत बल पॉलिसी आहे फायद्याची
एलआयसी अमृत बाल योजना ही एक नॉन लींक्ड जीवन विमा पॉलिसी आहे व ती लहान मुलांचे भविष्य लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आलेली आहे. एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये पालक मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करू शकतात.
एलआयसीचा हा लहान मुलांसाठी असलेला फायदेशीर प्लान घेण्याकरिता मुलाचे वय किमान 30 दिवस तर कमाल 13 वर्ष असणे गरजेचे आहे. एलआयसीची ही पॉलिसी साधारणपणे कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 25 वर्षात परिपक्व होते.
कसा आहे प्रीमियम पेमेंट मोड?
तुम्हाला ही पॉलिसी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खरेदी करता येते. यामध्ये किमान विम्याची रक्कम दोन लाख रुपये आहे तर जास्तीत जास्त कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. म्हणजे तुम्ही यामध्ये कितीही प्रमाणात गुंतवणूक करू शकतात. तसेच तुम्ही ही पॉलिसी ऑनलाईन पद्धतीने घेतली तर काही सूट यामध्ये मिळू शकते.
तसेच एलआयसी अमृत बाल पॉलिसी मध्ये मासिक, त्रिमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर तुम्ही प्रीमियमची रक्कम भरू शकतात. यामध्ये तुम्ही सिंगल प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम अंतर्गत दोन पर्यायानुसार सुट लाभ रायडर निवडण्याची सुविधा देखील घेऊ शकतात. या पॉलिसीच्या सुरुवातीपासून पॉलिसीची मुदत संपेपर्यंत विम्याची रक्कम हमी जोडणी द्वारे 80 रुपये प्रति हजार मूळ विमा रकमेच्या शेवटी उपलब्ध असते.
या पॉलिसीमध्ये जर पॉलिसीधारक मुलाचे वय प्रवेशाच्या वेळी आठ वर्षापेक्षा कमी असेल, तर जोखीम पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी किंवा पॉलिसीच्या नंतर लगेचच सुरू होते.
एलआयसी अमृत बाल योजनेची वैशिष्ट्ये
1- पॉलिसी घेताना वयोमर्यादा कमीत कमी 30 दिवस आणि जास्तीत जास्त तेरा वर्ष निश्चित करण्यात आलेली आहे.
2- या पॉलिसीचे परिपक्वता कालावधी हा 18 वर्षे आणि कमाल पंचवीस वर्षाचा आहे.
3- या पॉलिसी अंतर्गत लहान प्रीमियम पेमेंटसाठी उपलब्ध असून ज्यामध्ये पाच,6 किंवा सात वर्ष आहेत.
4- यामध्ये किमान विमा रक्कम दोन लाख रुपये आहे आणि कमाल विमा रकमेवर कोणतीही मर्यादा नाही.
5- महत्वाचे म्हणजे एलआयसीची ही पॉलिसी काही अटीसह तुम्हाला कर्जाची सुविधा देखील देते.
6- ही पॉलिसी तुम्ही एलआयसी एजंट किंवा एलआयसी वेबसाईटवर तुम्ही खरेदी करू शकतात.