एलआयसीचे ‘हे’ सुपरहिट प्लॅन शेतकऱ्यांना बनवू शकतात करोडपती! जाणून घ्या संपूर्ण तपशील

भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षितता खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न अस्थिर आणि अनिश्चित राहते.

Ajay Patil
Published:
lic plan

LIC Plan For Farmer:- भारत हा कृषीप्रधान देश असून भारतामध्ये कृषी क्षेत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षितता खूप महत्त्वाचे असते. आपल्याला माहित आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आणि हवामान बदलामुळे शेतीचे उत्पन्न अस्थिर आणि अनिश्चित राहते.

त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भविष्याकरिता नियोजन करणे आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षा प्रदान करणे खूप कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीमध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी ही अनेक प्रकारच्या योजना राबवते व यामधील काही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुरक्षा मिळण्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत

व त्यांचे आर्थिक भविष्य देखील सुरक्षित या माध्यमातून होते. त्यापुढे या लेखात आपण एलआयसीचे असे चार सुपरहिट प्लान बघणार आहोत जे शेतकऱ्यांना करोडपती बनवू शकतात.

एलआयसीच्या शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरतील अशा योजना

1- एलआयसी शेतकरी जीवन विमा योजना- एलआयसीची ही एक महत्वपूर्ण योजना असून जर या योजनेचा उद्देश बघितला तर तो शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमी प्रीमियम मध्ये चांगले विमा संरक्षण मिळते व ज्यामुळे ते शेती सोबतच त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देखील देऊ करते

व या योजनेचे वैशिष्ट्ये जर बघितले तर शेतकऱ्यांसाठी कमी प्रीमियम दर यामध्ये एलआयसीने सेट केला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जीवन विमा संरक्षण मिळते.

जर दुर्दैवाने एखाद्या शेतकऱ्याचे जर अकाली निधन झाले तर त्याच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नानुसार प्रीमियम निवडण्याची परवानगी देते. तसेच हे प्रीमियम भरण्याची सुविधा शेतकऱ्यांच्या हंगामी उत्पन्नानुसार ठरवली जाऊ शकते.

2- एलआयसी पेन्शन योजना- जेव्हा शेतकऱ्यांचे उतारवय सुरू होते तेव्हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत थांबतो व अशा परिस्थितीमध्ये एलआयसीची पेन्शन योजना एक उत्तम पर्याय शेतकऱ्यांसाठी ठरू शकते. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना महिन्याला स्थिर पेन्शन मिळू शकते. जेणेकरून त्यांच्या उतारवयामध्ये त्यांना आरामशीर जीवन जगता येईल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नियमित आणि स्थिर पेन्शन मिळते व आयुष्यभर आर्थिक सुरक्षा मिळते. शेतकरी यामध्ये त्यांच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करू शकतात आणि त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो. विशेष म्हणजे या प्लानमध्ये पेन्शन तर मिळतेच परंतु लाईफ कव्हर देखील यामध्ये समाविष्ट आहे.

म्हणजे शेतकऱ्याचे कुटुंब देखील यामध्ये सुरक्षित राहते. या प्लॅनमध्ये पेन्शन मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ जसे की एकरकमी किंवा मासिक पेन्शनचा पर्याय तुम्हाला निवडता येतो.

3- एलआयसी जीवन शांती योजना- एलआयसीची ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना त्यांच्या कुटुंबाचे सुरक्षा त्यांच्या आयुष्यानंतर देखील हवी आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकरकमी पैसे देऊन आजीवन पेन्शनचा लाभ मिळवता येऊ शकतो.

या योजनेत एकरकमी गुंतवणूक केल्यावर शेतकऱ्यांना आयुष्यभर पेन्शन मिळू शकते. विशेष म्हणजे यासाठी अपघात विमा देखील आहे व कोणत्याही अपेक्षित घटनेच्या बाबतीत शेतकऱ्याला संरक्षण मिळते.या योजनेत शेतकऱ्यांना निश्चित परतावा मिळू शकतो.

4- एलआयसी जीवन रक्षक योजना- ही एक नॉन लिंक्ड मुदत विमा योजना असून जी शेतकऱ्यांच्या अकाली मृत्यूच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. या योजनेत शेतकरी त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित भविष्य देण्यासाठी कमी प्रीमियममध्ये उच्च विमा संरक्षण मिळू शकते.

ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला कोणतीही अडचण येत नाही. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई मिळते. या योजनेचा अर्ज आणि प्रीमियम भरण्याची प्रक्रिया सोपी असून ज्यामुळे शेतकऱ्यांना ते स्वीकारणे आणि समजणे देखील सोपे होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe