Loan Against PPF: तुम्ही पीपीएफ खात्यातून गुंतवणूक केली आहे का?तर मिळेल 1 टक्के व्याजदराने कर्ज! वाचा नियम

Published on -

Loan Against PPF:- गुंतवणुकीचे जर आपण पर्याय पाहिले तर यामध्ये बरेच गुंतवणूकदार बँक आणि विविध प्रकारच्या सरकारच्या योजनांना प्राधान्य देतात. बँकांच्या बाबतीत पाहिले तर बँकांच्या माध्यमातून अनेक आकर्षक ऑफरसह मुदत ठेव योजना राबवल्या जातात व अशाच प्रकारच्या अनेक योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील राबवल्या जात असून या योजनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते.

अशाच गुंतवणूक योजनांपैकी जर आपण पाहिली तर पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारच्या माध्यमातून चालवले जाणारी दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे व यावर आकर्षक व्याजदर आणि परतावा देखील चांगला मिळतो.

एवढेच नाही तर या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक देखील संपूर्णपणे करमुक्त देखील असते. यापैकी आणखी या योजनेचे वैशिष्ट्य पाहिले तर या योजनेमध्ये जर गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला अडचणीच्या कालावधीमध्ये कर्ज देखील मिळू शकते. याकरता तुम्हाला फक्त काही नियमांची पूर्तता करणे गरजेचे असते.

 सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळते कर्ज?

या योजनेमध्ये गुंतवणूक सुरू केल्यानंतर खातेधारकांना किमान तिसऱ्या आर्थिक वर्षानंतर या माध्यमातून कर्ज घेता येते. या मध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे कर्जाची सुविधा फक्त सहाव्या एक वर्षाच्या समाप्तीपर्यंत या माध्यमातून उपलब्ध आहे. या कर्जाची वैशिष्ट्य म्हणजे तुमची जेवढी रक्कम यामध्ये गुंतवलेली असते

अशा संपूर्ण रकमेकरिता तुम्हाला कर्ज मिळत नाही. तुम्ही ज्या वर्षाकरिता कर्जाची मागणी किंवा विनंती केली असेल त्या वर्षाच्या आधीच्या दोन वर्षाच्या शेवटी जी  रक्कम तुमची गुंतवणूक झालेली असेल तिची जास्तीत जास्त 25 टक्क्यांपर्यंत कर्ज तुम्हाला मिळते.

म्हणजेच तुम्ही जर 2023 मध्ये कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला त्यावेळेस तुमच्या पीपीएफ खात्यातील 31 मार्च 2022 रोजी जी काही रक्कम जमा झालेली असेल तिच्या 25% रक्कम कर्ज म्हणून मिळते.

 या कर्जावर किती आकारला जातो व्याजदर?

तुम्हाला देखील तुमच्या पीपीएफ खात्यातून कर्ज घ्यायचे असेल तर त्याचा व्याजदर हा सरकारच्या माध्यमातून ठरवलेला असतो किंवा निर्धारित केलेला असतो. त्याचा जो काही प्रभावी व्याजदर आहे त्यापेक्षा एक टक्के याचा व्याजदर जास्त असतो.

समजा सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1% आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आता तुमच्या स्थानिक पीपीएफ शाखेत कर्जाची विनंती केली तर त्याचा व्याजदर तुम्हाला 8.1 टक्के इतका असेल.

एकदा तुम्ही कर्ज घेताना जो व्याजदर निश्चित झालेला असेल तो कर्ज परतफेडीपर्यंत कायम राहतो. ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही.

 किती असतो कर्ज परतफेडीचा कालावधी?

या माध्यमातून जर तुम्ही कर्ज घेतले तर तुम्हाला ज्या महिन्यांमध्ये कर्ज मंजूर झाले आहे त्या महिन्याच्या एक तारखेपासून तीन वर्षापर्यंत परतफेड करणे गरजेचे असते. ती परतफेड तुम्ही एकरकमी किंवा 36 महिन्यात दोन किंवा अधिक मासिक ईएमआय मध्ये करू शकतात.

परंतु काही कारणांमुळे तुम्हाला कर्जाची परतफेड वेळेवर करता आली नाही किंवा परतफेडीच्या 36 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही अंशिक परतफेड करू शकत नसाल तर या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक वर्षी एक टक्के ऐवजी सहा टक्के दराने व्याज आकारले जाते. मात्र यामध्ये लक्षात ठेवावे.

दिवसाच्या कर्जाच्या बाबतीत महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला फक्त एकच कर्ज या माध्यमातून घेता येऊ शकते. जोपर्यंत तुम्ही पहिल्या कर्जाची परतफेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरे कर्ज मिळत नाही. म्हणजेच एका वर्षामध्ये तुम्हाला फक्त एकदाच कर्ज मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe