Loan Option:- जीवनामध्ये कोणती गोष्ट केव्हा उद्धवेल आणि केव्हा मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता भासेल हे कोणाला सांगता येणार नाही. कारण अनेक प्रकारचे संकटे व्यक्तीवर येऊ शकतात व अचानकपणे पैशांची मोठ्या प्रमाणावर गरज भासू शकते.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यक असलेला सगळाच पैसा आपल्याकडे असेल असे होत नाही व निर्माण झालेली गरज किंवा संकटामध्ये पैसा लागत असतो अशा परिस्थितीत खूप मोठ्या प्रमाणावर गोंधळ होण्याचे स्थिती निर्माण होते. त्यामुळे आपण काही नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींकडून पैसे अरेंज करण्यामागे लागतो.
परंतु अशावेळी अशा लोकांकडे देखील पैसे असतीलच असे होत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर पैशाची गरज उद्भवली तर काही मार्ग असे आहेत की तुम्ही ताबडतोब पैशांची व्यवस्था करू शकतात.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे मार्ग करू शकता तुमच्यासाठी पैशांची व्यवस्था
1- आगाऊ पगार कर्ज( ऍडव्हान्स सॅलरी लोन)- जर नोकरी करत असाल तर तुम्ही ऍडव्हान्स सॅलरी लोनचा ऑप्शन निवडू शकता. अनेक बँका आणि वित्तीय संस्था नोकरदार लोकांना ऍडव्हान्स सॅलरी लोन देतात. हे कर्ज तुमच्या पगाराच्या तीन पट तुम्हाला मिळू शकते.
विशेष म्हणजे या प्रकारचे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची गरज भासत नाही किंवा कमीत कमी कागदपत्रे लागतात.
महत्वाच्या अटींचे पालन करून तुम्हाला हे कर्ज सहजरीत्या उपलब्ध होते ईएमआयच्या माध्यमातून तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकतात. या कर्जाचे व्याजदर मात्र खूपच जास्त असतात. सॅलरी लोन वर 24 ते 30 टक्के पर्यंत व्याजदर आकारला जातो.
2- तुमच्याकडे असलेल्या कारवर लोन घेणे– तुम्हाला कमी टाइमिंग मध्ये पैसा अरेंज करायचा असतो तेव्हा तुम्ही तुमचे मालमत्ता वापरू शकता व त्याद्वारे पैसा उभा करू शकतात. तुमच्याकडे जर कार असेल तर ती सिक्युरिटी म्हणून ठेवून तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकतात.
याकरिता फायनान्स कंपनी किंवा बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन कर्जासाठी अर्ज भरावा लागतो व या अर्जामध्ये कारची कंपनी तसेच त्या कारचे मॉडेल, उत्पादनाचे वर्ष व कर्ज घेण्याचे कारणे इत्यादी तपशील तुम्हाला नमूद करावा लागतो.
लागणारे आवश्यक कागदपत्रे मागितल्यावर सादर करावी लागतात. तूमच्या कारच्या मूल्याचे मूल्यांकन केल्यानंतर बँक कर्जाची रक्कम ठरवते.
3-पीपीएफ किंवा एलआयसीवर घेऊ शकतात कर्ज– तुम्ही जर दीर्घ मुदतीच्या योजनेमध्ये गुंतवणूक केली असेल आणि तुम्हाला ती योजना बंद करायची नसेल तर तुम्ही त्यावरील कर्जाची सुविधाचा वापर अशा परिस्थितीत करू शकतात. यामध्ये पीपीएफ आणि एलआयसी सारख्या दीर्घकालीन योजनांवर तुम्ही सहजपणे कर्ज घेऊ शकतात.
हे कर्ज पर्सनल लोनपेक्षा तुम्हाला स्वस्तात मिळते. यामध्ये पीपीएफ वर केवळ पाच वर्षांसाठी कर्जासाठी तुम्हाला अर्ज करता येतो. सहाव्या वर्षापासून आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील मिळते.
4- सोनेतारण कर्ज– तुमच्याकडे जर सोने असेल तर तुम्ही त्यावर देखील कर्ज घेऊ शकतात व हा सोयीचा पर्याय सगळ्यांना माहिती आहे. पर्सनल लोन तसेच प्रॉपर्टी व कार्पोरेट लोन यासारख्या कर्जाच्या तुलनेत गोल्ड लोन स्वस्त आहे व इतर कर्जाच्या तुलनेत याचे निकष देखील सोपे आहेत.
क्रेडिट स्कोर वगैरे काही यामध्ये लागत नाही. म्हणजेच तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तरी काही फरक पडत नाही. कारण तुम्हाला मिळणारी कर्जाची रक्कम ही तुमच्या सोन्याच्या मूल्यानुसार तुम्हाला दिली जात असते.