LPG cylinder : महागाईपासून मोठा दिलासा! आता ‘इतक्या’ स्वस्तात मिळतील LPG सिलेंडर, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
LPG cylinder

LPG cylinder : देशात इंधनाच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अनेकजण तर इंधनावर न चालणाऱ्या गाड्या वापरत आहेत. बाजारामध्येही मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने लाँच होऊ लागली आहे. अशातच आता सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

LPG सिलेंडर देखील सर्वसामान्य जनतेला जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागत आहेत. दरम्यान, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्या LPG सिलेंडर चे दर ठरवत असतात. मागील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर 100 रुपयांनी कमी केले होते.

परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल केला नव्हता. अशातच आता केंद्र सरकार घरगुती सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची किंमत सरकार 200 रुपयांपर्यंत कमी करण्याच्या तयारीत आहे. जर असे झाले तर महागाईच्या काळात सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळू शकतो.

केंद्र सरकार आता घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर एकूण 200 रुपयांची सबसिडी जाहीर करू शकते. त्यामुळे आता सरकारने या निर्णयाची घोषणा केली तर महागाईने हैराण झालेल्या सर्वसामान्य जनतेला 200 रुपयांनी कमी किमतीत सिलिंडर खरेदी करता येईल.

जाणून घ्या LPG चे सध्याचे दर

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये इतकी होती. तर त्याच वेळी, एलपीजी सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये 1102.50 इतकी रुपये होती. शिवाय ती कोलकातामध्ये 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये इतकी होती.

हे लक्षात घ्या की पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीत बदल करत असतात. समजा जर यामध्ये 200 रुपयांची कपात झाल्यास राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये इतकी होऊ शकते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती तसेच 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ठरवत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe