MahaBank Personal Loan:- आपल्याला अचानकपणे बऱ्याचदा आर्थिक गरज किंवा आर्थिक समस्या उद्भवते. जसे की, हॉस्पिटलचा खर्च, मुलांच्या शिक्षणासाठी भरायची फीस किंवा शिक्षणावरील खर्च, घरातील मुला मुलींचे लग्नकार्य किंवा इतर अनेक बाबीं करिता आपल्याला आर्थिक गरज भासते व अशावेळी आपल्याकडे पुरेसा पैसा असतोच असे नाही.
त्यामुळे बरेच व्यक्ती हे बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोनचा आधार घेतात. मग व्यक्ती व्यावसायिक असो किंवा पगारदार म्हणजेच नोकरी पेशा असो त्यांना पैशांची गरज भागवण्यासाठी पर्सनल लोन ची मदत घ्यावीच लागते व या पद्धतीचे लोन वेगवेगळे बँका देत असतात.

तसेच प्रत्येक बँकेचे पर्सनल लोनच्या संबंधीच्या व्याजदरापासून तर नियम देखील वेगवेगळे असतात. याचा अनुषंगाने या लेखांमध्ये आपण पगारदार व्यक्तींकरिता बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून दिला जाणाऱ्या पर्सनल लोन विषयी महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
बँक ऑफ महाराष्ट्राची पर्सनल लोन स्कीम फॉर सॅलरीड कस्टमर म्हणजेच पगारदार व्यक्तींसाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे महाबँक पर्सनल लोन स्कीम
यामध्ये पाहिले तर बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातुन पगारदार व्यक्तींकरिता महा बँक पर्सनल लोन स्कीम राबवण्यात येते व या माध्यमातून मुदत कर्ज देण्यात येते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून महाबँक पर्सनल लोन स्कीम राबवण्याचा उद्देश म्हणजे ग्राहकाला वैयक्तिक आर्थिक खर्चाच्या दृष्टिकोनातून त्याची आवश्यकता पूर्ण करणे हा आहे.
काय आहे बँक ऑफ महाराष्ट्राची या स्कीमचा लाभ घेण्यासाठी ची आवश्यक पात्रता
जर आपण या योजनेच्या आधारे पर्सनल लोन घेण्याचा विचार केला तर त्यांची रोजगाराच्या आधारे तीन श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
1- श्रेणी A- या श्रेणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर बँकेत सॅलरी खाते असलेले केंद्र सरकार / राज्य सरकार/ सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/ सरकारी शैक्षणिक संस्था यांच्या नोकरीमध्ये कायम झालेले कर्मचारी व त्यासोबतच बँक ऑफ महाराष्ट्राची आणि इतर कोणत्याही बँकेची समाधानकारक खातेसंबंध असलेले व नोकरीत कायम असलेले कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.
2- श्रेणी B- यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर बँकेत सॅलरी खाते असलेले, बाह्य रेटिंग A आणि त्याहून अधिक असलेल्या प्रायव्हेट/ पब्लिक लिमिटेड कंपनीच्या नोकरीमध्ये कायम झालेले कर्मचारी व त्यासोबतच बँकेची कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत समाधानकारक सॅलरी खाते संबंध असणारे कर्मचारी या श्रेणीत येतात.
3- श्रेणी C- तसेच इतर सॅलरी खातेधारक( नोकरीमध्ये पर्मनंट असलेले कर्मचारी ) त्यांचा पगार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जमा होत आहे आणि बँकेचा त्या कर्मचाऱ्यांच्या नियोक्त्याशी करार झाला आहे किंवा त्याच्याकडून कुठलाही अपरिवर्तनाविषयी हमी उपलब्ध आहे.अशा कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होतो.
या कर्जासाठी किमान वार्षिक उत्पन्नाचे मर्यादा किती आहे?
जर आपण या कर्जासाठी किमान वार्षिक उत्पन्नाची मर्यादा पाहिली तर ती तीन लाख रुपये आहे व त्यासोबतच मागील एक वर्षाचा आयटीआर/ फॉर्म 16 अनिवार्य करण्यात आलेला आहे.
किती मिळू शकते या माध्यमातून कर्ज?
महाबँक पर्सनल लोन स्कीमच्या माध्यमातून जास्तीत जास्त वीस लाख रुपये कर्जाची मर्यादा असून कर्जाची रक्कम ग्रास मासिक उत्पन्नाच्या वीस पट किंवा कमाल मर्यादा यापैकी जी कमी असेल तितके कर्ज मिळते. तसेच यावर कुठल्याही प्रकारचे मार्जिन शुल्क लागत नाही.
अर्जदाराची वयोमर्यादा किती असणे गरजेचे आहे?
यामध्ये अर्जदार हा किमान 21 वर्षे आणि कमाल कर्ज मंजूरीच्या वेळी 58 वर्षे वय असणे गरजेचे आहे. त्यासोबतच कर्जदाराचे वय आणि कर्ज परतफेडीचा कालावधी यांचा एकत्रित कार्यकाळ सेवानिवृत्तीचे वय किंवा साठ वर्ष यापैकी जे कमी असेल इतके असणे गरजेचे आहे.
किती आहे कर्ज परतफेडीचा कालावधी?
त्यामध्ये श्रेणीनुसार विचार केला तर
A श्रेणीसाठी– बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पगार खाते असेल तर कर्ज परतफेडीचा कालावधी हा 84 महिन्याचा आहे. त्यासोबतच इतर बँकेमध्ये सॅलरी खाते असेल तर कर्ज परतफेडचा कालावधीत 60 महिन्यांचा आहे.
B व C श्रेणीसाठी– या दोन्ही श्रेणीच्या कर्मचाऱ्यांकरिता कर्ज परतफेडचा कालावधी हा साठ महिन्यांचा आहे.
किती आकारला जातो व्याजदर?
1- श्रेणी A( बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सॅलरी खाते असेल तर)- जर सिबिल स्कोर 800 आणि त्यापेक्षा अधिक असेल तर व्याजदर हा 9.75%, सिबिल स्कोर 776 ते 799 असेल तर प्रभावी व्याजदर 10.05%, आणि सिबिल स्कोर साडेसातशे ते 775 पर्यंत असेल तर व्याजदर 10.55, सिबिल स्कोर 700 ते 749 असेल तर व्याजदर 11.05%
इतर बँकेत झालेली खाते
श्रेणी A कर्मचाऱ्यांचे इतर बँकेत सॅलरी खाते असेल तर 800 आणि त्यापेक्षा जास्त सिबिल स्कोर असणाऱ्या करिता 10.55%, 776 ते 799 सिबिल स्कोर असलेल्यांकरिता व्याजदर 11.05%, 750 ते 775 सिबिल स्कोर असणाऱ्यांकरिता 11.55%, 700 ते 749 सिबिल स्कोर असणाऱ्यांसाठी 12.0%
2- श्रेणी B( बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सॅलरी खाते) सिबिल स्कोर 800 आणि त्यापेक्षा अधिक असेल तर 10.55%, 776 ते 799 दरम्यान सिबिल असेल तर 11.05%, 750 ते 775 सिबील असेल तर 11.55% आणि 700 ते 749 सीबील असेल तर 12.05%
इतर बँकेत झालेली खाते असेल तर
सिबिल स्कोर 800 आणि त्यापेक्षा अधिक असेल तर 10.95%, सिबिल 776 ते 799 असेल तर 11.55, 750 ते 775 सिबिल असणाऱ्यांसाठी 12.05% आणि 700 ते 749 सिबिल असणाऱ्या करिता व्याजदर 12.50% इतका आहे.
3- श्रेणी सी– 800 आणि त्यापेक्षा अधिक सिबिल असणाऱ्यांसाठी 10.95, 776 ते 799 सिबिल असणाऱ्यांसाठी 11.50%, 750 ते 775 बारा टक्के आणि 700 ते 749 सिबिल असणाऱ्यांसाठी 12.50% इतका व्याजदर आकारला जातो.
या कर्जाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी
या कर्जासाठी तुम्हाला जामीनदाराची आवश्यकता भासत नाही. तसेच या कर्जावर प्रक्रिया शुल्क हे कर्ज रकमेच्या एक टक्के+ जीएसटी म्हणजेच कमीत कमी एक हजार रुपये इतके आकारले जाते.