Mhada News:- प्रत्येकाला स्वतःचे घर असावे ही इच्छा असते. परंतु वाढत्या महागाईच्या कालावधीमध्ये मात्र प्रत्येकालाच हे स्वप्न पूर्ण करता येईल असे नव्हे. त्यातल्या त्यात पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करणे म्हणजे खूप जिकरीचे आणि अशक्य अशी गोष्ट आहे.
परंतु जर आपण महाराष्ट्र मधील महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा आणि सिडको या संस्थांचा विचार केला तर या माध्यमातून बरेच व्यक्ती हे आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना आपल्याला दिसून येतात.म्हाडाच्या आणि सिडकोच्या माध्यमातून घरांच्या साठी लॉटरीची प्रक्रिया राबविण्यात येते

व यामध्ये भाग्यवान विजेत्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होताना आपल्याला दिसते. म्हाडाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना देखील राबवल्या जातात. याच पद्धतीने आता म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या किंवा मुंबई बोर्डाच्या माध्यमातून प्लॉटची लिलाव करण्याची योजना आखण्यात आली असून या माध्यमातून म्हाडाला जो जास्तीचे ऑफर देईल त्याला ती जमीन देण्यात येणार आहे. नेमकी ही योजना कशी राहणार आहे? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
म्हाडा विकणार आरक्षित प्लॉट
याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या मुंबई बोर्डाच्या माध्यमातून प्लॉटच्या लिलाव करण्याची योजना आखण्यात आलेली असून यामध्ये म्हाडाला जो जास्तीची ऑफर देईल त्याला ती जमीन देण्यात येणार आहे. या प्रक्रिया करिता म्हाडाच्या माध्यमातून सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काही प्लॉट उपलब्ध आहेत त्यांची माहिती द्यावी अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आले आहेत.
अशा पद्धतीने जेव्हा प्लॉटची माहिती मिळेल तेव्हा त्या प्लॉटचे क्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे त्यावरून त्या प्लॉटची किंमत ठरवली जाणार असून त्यानंतर लिलावासाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. म्हाडाचे हे प्लॉट मुंबईतील वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत. म्हाडाचे जे हे प्लॉट आहेत ते प्लॉट कॉलेज तसेच हॉस्पिटल, खेळाची मैदानी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी आरक्षित आहेत.
परंतु बऱ्याच वर्षांपासून त्यांचा वापर न करता ते असेच पडून असल्यामुळे त्या प्लॉटवर किंवा जमिनीवर अतिक्रमण करण्यात येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिक्रमण देखील करण्यात आल्यामुळे ते हटवण्यासाठी व अन्य समस्यांचा सामना म्हाडाला करावा लागतो.
त्यामुळे या समस्यांपासून मुक्तता मिळावी याकरिता म्हाडाच्या माध्यमातून काही अटी व शर्तींसह आपल्या आरक्षण प्लॉटची योजना आखली आहे. अशा पद्धतीच्या प्लॉट विक्री केल्यानंतर देखील त्या ठिकाणी आरक्षण लागू असणार आहे. जरी कोणी ग्राहकाने हा प्लॉट विकत घेतला तर आरक्षणांतर्गतच त्या जमिनीचा वापर करावा लागणार आहे.
म्हाडा काढणार सहाशे घरांसाठी लॉटरी
स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लॉटरी काढण्यात येणार असून ही लॉटरी सहाशे घरांसाठी काढण्याची घोषणा म्हाडा कडून करण्यात येण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2023 मध्ये काढण्यात आलेल्या लॉटरी मधून सहाशे घरे शिल्लक राहिलेले असून ती सहाशे घरी आता नव्या लॉटरीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे आता मुंबई बोर्डाच्या माध्यमातून या योजनेकरिता परीक्षण देखील करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. एप्रिलमध्ये लॉन्च होणाऱ्या या नव्या लॉटरीमध्ये इतर काही घरांना समाविष्ट केले जाऊ शकते की नाही याचे देखील परीक्षण करण्यात येणार आहे.