इलेक्ट्रिक वाहनांबद्दल मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा; वाचा , ‘असा’ होईल फायदा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-इलेक्ट्रिक वाहन विकत घेणाऱ्या आणि चालवणयांसाठी खुशखबर आहे. देशातील सुमारे 69,000 हजार पेट्रोल पंपांवर कमीतकमी एक इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग कियोस्क बसविण्याची सरकारची योजना आहे. यामागील सरकारचा हेतू म्हणजे देशातील विद्युत वाहनांच्या मागणीला प्रोत्साहन देणे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली आहे. गडकरी म्हणाले की, सरकारने या वाहनांवरील जीएसटी, 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासह इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, इलेक्ट्रिक टूव्हीलर व थ्री व्हीलरच्या बॅटरी किंमत आणि व्हीकल कॉस्ट वेगळी ठेवण्यासही परवानगी देण्यात येईल.

गडकरींच्या मते, बॅटरी चार्जिंग इकोसिस्टम खूप महत्वाची आहे. म्हणूनच, देशातील सुमारे 69000 पेट्रोल पंपांवर कमीतकमी एक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग कियोस्क बसविण्याची योजना आहे जेणेकरुन लोक इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे अधिक वाटचाल करू शकतील.

फ्लेक्स इंजिनचे उत्पादन वाढले :- भारत जागतिक ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या तयारीत आहे, असे सांगत गडकरी यांनी ऑटोमोबाईल उद्योगाला फ्लेक्स इंजिनचे उत्पादन वाढवण्यास सांगितले. या इंजिनचे वैशिष्ट्य म्हणजे पेट्रोल किंवा इथेनॉल / सीएनजी त्यामध्ये इंधन म्हणून वापरता येऊ शकतात.

गडकरी पुढे म्हणाले की, आमच्या वाहन उद्योगाने विविध डिझाईन आणि मॉडेल्स, संशोधन आणि विकास, मोठे बाजार, स्थिर सरकारी चौकट आणि उज्ज्वल व तरूण अभियांत्रिकी विचार विकसित करण्याच्या दृष्टीने बरीच प्रगती केली आहे. भारत जगातील सर्वात मोठा टूव्हीलर्स उत्पादक देश बनला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment