Money Treasure Plants : ‘ही’ आहेत पैशांची झाडे, घरात लावताच होतो पैशांचा पाऊस; तुमच्याकडे आहे का एकतरी?

Ahmednagarlive24 office
Published:
Money Treasure Plants

Money Treasure Plants : पैसे झाडाला लागत नाही, ते कमवावे लागतात असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जास्त कष्ट, मेहनत, परिश्रम करूनही बऱ्याचवेळा आपल्याला अपेक्षेप्रमाणे पैसा मिळत नाही. त्यात सध्याच्या काळात पैसा सर्वस्व असल्यासारखे झाले आहे.

परंतु वास्तुशास्त्रामध्ये काही झाडांना धन, समृद्धी, वैभव, ऐश्वर्य यांच्याशी निगडीत असल्याचे सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार, अशी काही झाडे किंवा रोपटी जी आपण आपल्या घरी वा अंगणात लावणे खूप लाभदायक असल्याचे म्हटले जाते.

अश्वगंधा वनस्पती

वास्तुशास्त्रामध्ये अश्वगंधा वनस्पतीला सुख आणि समृद्धीचे कारण मानण्यात आले आहे. समजा एखाद्या व्यक्तीने हे रोप घरात लावले तर त्याची बिघडलेली कामेही सुरळीत होतात. नोकरी-व्यवसायात प्रगतीसाठी ही वनस्पती खूप खास आहे. जर हे रोप घरात लावले तर त्याला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.

मनी प्लांट

ही संपत्ती आकर्षित करणारी वनस्पती मानली जाते. असे मानण्यात येते की हे रोप घरात लावले तर त्या व्यक्तीकडे पैसे यायला सुरुवात होते. तसेच ही वनस्पती वाढल्यास आर्थिक स्थिती सुधारते. परंतु हे लक्षात ठेवा की, या वनस्पतीचा वेल सतत वरच्या दिशेने गेला पाहिजे. तरच त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल.

हरशृंगार वनस्पती

जर तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर हरशृंगार वनस्पती महत्त्वाची आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती आपल्या घरात हे रोप लावतो, त्याच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहत असते. त्यामुळे त्याला त्याच्या आयुष्यात पैशाची कसलीच कमतरता पडत नाही.

श्वेतार्क वनस्पती

वास्तुशास्त्रामध्ये श्वेतार्क वनस्पती खूप शुभ मानली जाते. जर एखाद्या व्यक्तीने ही वनस्पती लावली तर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती नेहमी मजबूत राहते. खास करून घराच्या दाराजवळ किंवा गॅलरीत हे रोप लावणे खूप शुभ असते.

शमी वनस्पती

वास्तुशास्त्रामध्ये शमीची वनस्पती अनेक दृष्टीकोनातून फायद्याची असते. जर कामात यश मिळवायचे असेल तर या वनस्पतीची नेहमी पूजा करावी. असे मानतात की लंकेच्या विजयापूर्वी भगवान श्रीरामांनी शमीची पूजा केली होती. तसेच या वनस्पतीमुळे शनीचे सर्व दोष दूर होतात. त्यामुळे घरामध्ये सुख-समृद्धी येते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe