देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या PF खात्यात येणार जास्त पैसे! कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट नियमात केला बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ एक महत्त्वाची संस्था असून देशातील खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सगळ्या प्रकारचे व्यवस्थापन या संघटनेच्या माध्यमातून केले जाते.

Ajay Patil
Published:
epfo new rule

EPFO Claim Settlement New Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ एक महत्त्वाची संस्था असून देशातील खाजगी आणि सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सगळ्या प्रकारचे व्यवस्थापन या संघटनेच्या माध्यमातून केले जाते. तसेच ईपीएफ दाव्यांच्या संदर्भातले नियम व त्या नियमांची अंमलबजावणी देखील ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना करत असते.

कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वाची संघटना असून यामध्ये सात कोटी सक्रिय सदस्य आहेत. आपल्याला माहित आहे की, कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीएफसाठी काही योगदान दिले जाते व तितकेच योगदान हे कंपनी म्हणजेच नियोक्ता यांच्या माध्यमातून देखील दिले जात असते.

अशाप्रकारे ईपीएफ खात्यामध्ये जमा झालेली रक्कम कर्मचाऱ्यांना काढता देखील येते व या मधूनच पेन्शन देखील मिळत असते. विशेष म्हणजे या रकमेवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून व्याज देखील दिले जाते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून त्यामुळे देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता ईपीएफओ सदस्यांना क्लेम सेटलमेंट करताना मात्र भविष्य निर्वाह निधीमध्ये जे पैसे जमा झालेले असतील त्यावर अधिक व्याज मिळणार आहे.

कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने इपीएफ दाव्याच्या सेटलमेंट प्रक्रियेमध्ये व्याज देण्याचे जे काही नियम होते त्यामध्ये आता मोठा बदल केला आहे.या बदलामुळे जास्तीचे पैसे तर कर्मचाऱ्यांना मिळतीलच परंतु दाव्यांचा निपटारा देखील वेगात होण्यास मदत होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPF दावा निकाली काढण्याच्या नियमात केला बदल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने ईपीएफ दावा सेटलमेंट करताना जो काही व्याज देण्याचा नियम होता त्यामध्ये बदल करण्याला मंजुरी दिली आहे व या दिशेने आता सीबीटीने ईपीएफ योजना 1952 च्या परिच्छेद 60(2)(b) मध्ये महत्वपूर्ण सुधारणा मंजूर केली आहे.

सध्या जर आपण बघितले तर ईपीएफ योजनेच्या सध्याच्या तरतुदीनुसार महिन्याच्या 24 तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंटच्या दाव्यांसाठी आधीच्या महिन्याच्या शेवटपर्यंत व्याज देण्याची तरतूद होती.

परंतु आता या नियमातच बदल करण्यात आला असून आता नवीन नियमानुसार क्लेम सेटलमेंट म्हणजेच दावा निकाली काढण्याची जी काही तारीख असेल त्या तारखेपर्यंत आता व्याज दिले जाणार आहे. त्यामुळे आता ईपीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यामध्ये जास्तीचे व्याज मिळणार आहे.

दावा निकाली निघण्याच्या तारखेपर्यंत आता व्याज मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या खात्यात जास्त पैसे जमा होतील व याआधी कोणत्याही महिन्याच्या 24 तारखेपूर्वी जर निधी काढला तर त्या महिन्यापूर्वीचा जो काही महिना असेल त्या महिन्यासाठी व्याज दिले जात होते.

त्यामुळे व्याजापोटी कर्मचाऱ्यांचे म्हणजेच ईपीएफ सदस्यांचे नुकसान व्हायचे. इतकेच नाही तर 25 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत व्याज देय दाव्यांवर प्रक्रिया होत नव्हती.

परंतु आता या नवीन निर्णयानंतर मात्र अशा प्रकारच्या दाव्यांवर संपूर्ण महिना प्रक्रिया केली जाईल व त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होईल व क्लेम सेटलमेंट देखील वेगात करणे शक्य होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe