सणासुदीच्या कालावधीमध्ये वाहन उत्पादक कंपन्यांपासून तर अनेक गॅझेट तयार करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या जातात व त्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो.
कारण सणासुदीच्या कालावधीमध्ये अनेक नवीन वस्तू घेण्याचा ट्रेंड भारतामध्ये फार पूर्वापार चालत आलेला असल्यामुळे फ्लिपकार्ट तसेच ॲमेझॉन सारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म देखील या दिवसांमध्ये सेल आयोजित करून माध्यमातून खूप चांगल्या ऑफर ग्राहकांसाठी जाहीर करत असतात.
याचप्रमाणे जर आपण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2024 चा विचार केला तर हा सेल सुरू होण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी अजून बाकी आहे. तो त्या अगोदरच मोटोरोला कंपनीने दोन प्रकारच्या लोकप्रिय स्मार्टफोनवर उत्तम अशा ऑफर ग्राहकांकरिता आणल्या असून या अंतर्गत मोटोरोला Edge50 Pro आणि मोटोरोला Edge50 Fusion खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
हे दोन्ही फोन ऑफरच्या किमतीवर प्री बुक केले जाऊ शकतात आणि 26 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणाऱ्या बिग बिलियन डे सेलच्या दरम्यान रीडिम देखील केले जाऊ शकतात.
कशी आहे मोटोरोला Edge50 Pro वर मिळणारी ऑफर आणि या फोनची वैशिष्ट्ये?
मोटोरोला कंपनीचा हा स्मार्टफोन 12 जीबी रॅम आणि 256 जीबी रॅम सहित येतो व या स्मार्टफोनची किंमत 35 हजार 999 रुपये आहे. परंतु या ऑफर अंतर्गत हा स्मार्टफोन तुम्ही 27 हजार 999 विकत घेऊ शकतात. विशेष म्हणजे यावर एक बँक ऑफर देखील कनेक्ट करण्यात आलेली आहे. या फोनची फीचर्स बघितली तर यामध्ये 6.7 इंच 1.5K POLED डिस्प्ले देण्यात आला असून जो 144Hz फ्रेश रेट सह येतो.
महत्वाचे म्हणजे या फोनमध्ये आयपी 68 रेटिंगचा वापर करण्यात आला असून यामुळे फोनचा पाणी आणि धुळीपासून बचाव होतो. तसेच वेगन लेदर फिनिश या स्मार्टफोनला प्रीमियम टच द्यायचे महत्वपूर्ण काम करतो.
हा स्मार्टफोन डॉल्बी ऍटमॉससह ड्युअल स्टिरिओ स्पीकर सह येतो. यामध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून पावर करिता फोनमध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 125W चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते आणि या स्मार्टफोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कशी आहे मोटोरोला Edge50 Fusion स्मार्टफोन वरील ऑफर आणि या फोनचे फीचर्स?
हा स्मार्टफोन तुम्ही 19999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत घरी आणू शकतात. जर आपण या स्मार्टफोनमधील फीचर्स पाहिले तर यामध्ये 6.7 इंचाचा कर्व POLED डिस्प्ले देण्यात आला असून जो 144Hz रिफ्रेश रेट आणि 1600nits चा बिग ब्राईटने सह येतो.
या स्मार्टफोनमध्ये ओवायएस सपोर्टसह 50 मेगापिक्सल सोनी LYTIA-700C प्रायमरी सेंन्सर आणि तेरा मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड लेन्स कॅमेरा देण्यात आला असून जो मॅक्रो कॅमेरा म्हणून देखील उत्तम काम करतो. पावरसाठी या फोनमध्ये 68W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 5000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.