365 दिवसात लखपती बनवणार शेअर ! 1 लाखाचे झालेत 43 लाख

Published on -

Multibagger Stock : शेअर मार्केट मध्ये नेहमीच लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करायला हवी जेणेकरून चांगले रिटर्न मिळतील असा सल्ला तुम्ही कित्येकांच्या तोंडून ऐकला असेल. पण काही शेअर्स कमी दिवसांमध्ये इतके जबरदस्त रिटर्न देतात की त्याची कामगिरी पाहून सर्वांनाच धक्का बसतो.

शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणाऱ्या अशाच एका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. सिगारेट आणि तंबाखू उत्पादन उत्पादक कंपनी एलीटकॉन इंटरनॅशनल लिमिटेडने फक्त 365 दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना लखपती बनवले.

या कंपनीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षाच्या परताव्याने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. गेल्या 12 महिन्यांत या मल्टी-बॅगर स्टॉकची किंमत 42 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या अनेक ट्रेडिंग सत्रांपासून हा स्टॉक अपर सर्किटमध्येचं आहे. यामुळे या स्टॉककडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.

काल हा स्टॉक टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 157.07 रुपयांवर क्लोज झाला होता. महत्त्वाची बाब म्हणजे 14 ऑक्टोबर 2024 रोजी या शेअरची किंमत फक्त 3.65 रुपये होती. एलीटकॉन इंटरनॅशनलचे मार्केट कॅपिटल आता 25104.44 कोटी रुपये इतके आहे.

ही कंपनी प्रामुख्याने सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करते, परंतु आता ती एफएमसीजी क्षेत्रात सुद्धा विस्तार करत आहे. अलीकडेच, कंपनीने दोन कृषी-आधारित कंपन्यांमधील नियंत्रणात्मक हिस्सेदारी घेतली आहे. या अधिग्रहणांचा उद्देश त्यांच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करणे हाच आहे.

या अधिग्रहणामुळे त्यांच्या महसूल सौर्समध्ये आणखी विविधता येणार आहे. लँडस्मिल अ‍ॅग्रोमधील 55% हिस्सा 52.85 कोटींना विकत घेण्यात आला, तर सनब्रिज अ‍ॅग्रोमधील 51.65% हिस्सा 128.40 कोटींना खरेदी करण्यात आला. गेल्या वर्षभरात, एलीटकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्सची किंमत अविश्वसनीयरित्या वाढली आहे.

या मल्टी-बॅगर स्टॉकच्या किमतीत गेल्या 365 दिवसांमध्ये चार हजार दोनशे टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थात एका वर्षभरापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असतील आणि ते शेअर्स आज पर्यंत होल्ड करून ठेवले असतील तर त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 43 लाख रुपये झाले आहे.

गेल्या बारा महिन्यांच्या काळात या शेअरची किंमत 3.65 रुपयांवरून 167 रुपयांवर गेली आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे स्टॉक 306 टक्क्यांनी वाढले आहेत. 2025 मध्ये आत्तापर्यंत या कंपनीचे स्टॉक 1414 टक्क्यांनी वाढले आहेत.

मागील तीन महिन्यांमध्ये या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. परंतु गत 30 दिवसांचा काळ कंपनीसाठी चांगलाच नुकसानीचा ठरलाय. गेल्या 30 दिवसांमध्ये कंपनीचे स्टॉक 15 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe