Multibagger Stocks : ‘या’ शेअरने उघडले गुंतवणूकदारांचे नशीब, फक्त 5 वर्षातच केले श्रीमंत !

Sonali Shelar
Published:
Multibagger Stocks

Multibagger Stocks : जर तुम्हीही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक शेअर घेऊन आलो आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना पाच वर्षातच मालामाल केले आहे. शेअर बाजार जरी जोखमीचे असले तरी देखील येथे योग्य वेळी गुंतवणूक केली तर तुमचे नशीब बदलू शकते. शेअर मार्केटमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो, कारण दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला फायदा होतो.

असे बरेच शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत उत्तम परतावा दिला आहे. असाच एक आश्चर्यकारक शेअर म्हणजे ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडचा शेअर. ज्याने अवघ्या पाच-सहा वर्षांत गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे.

ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया लिमिटेडच्या या स्टॉकने केवळ पाच वर्षांच्या कालावधीत गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 10 लाख रुपये करून दिले आहेत. येथे गुंतवणूक करणाऱ्यांनी सहा वर्षांत 1 लाख रुपयांचे 11 लाख केले आहेत. जरी या शेअरने गुरुवारी कमकुवत नोटेवर व्यवहार सुरू केला. पण दीर्घकाळात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.

सहा वर्षांचा परतावा

सहा वर्षांपूर्वी, 3 नोव्हेंबर 2017 रोजी Tube Investments of India Limited (Tube Investments of India Share) चा स्टॉक 252.10 रुपयांना होता. ज्यानंतर तो 1,147.87% च्या उसळीनंतर 3,158.35 रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच वर्षांत या शेअरने गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे. पाच वर्षांपूर्वी 9 नोव्हेंबर 2018 रोजी हा शेअर 299.90 रुपयांवर होता. ज्यामध्ये 953.13% परतावा नोंदवला गेला.

एका महिन्यात 7.72 टक्के परतावा

Tube Investments of India Limited च्या स्टॉकने गेल्या एका महिन्यात गुंतवणूकदारांना 7.71% परतावा दिला आहे. या स्टॉकने सहा महिन्यांत 16.05% परतावा मिळवला. या वर्षाच्या सुरुवातीपासून या समभागाने 13.38% परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या समभागाने 16.40% परतावा दिला आहे. गेल्या 52 आठवड्यांतील उच्च परतावा 3,736.40 रुपये आणि कमी 2,375.00 रुपये नोंदवला गेला.

कंपनीचा व्यवसाय ?

मुरुगप्पा समूहाची ही कंपनी भारतीय उत्पादन आणि अभियांत्रिकी कंपनी आहे. जे सायकल आणि चेन यांसारख्या धातूच्या वस्तू बनवतात. या कंपनीचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe