Jeevan Pramaan Life Certificate : पेन्शनधारकांनो लक्ष द्या, आता घरबसल्या बनवता येणार जीवन प्रमाणपत्र फक्त एक क्लिकवर…

Published on -

Life Certificate For Pensioners : निवृत्ती वेतन घेणार्‍यांना जिवंत असल्याचा पुरावा सादर करावा लागतो, जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र दाखल करावे लागते. त्यानंतरच पेन्शन मिळते. जर एखाद्याने जीवन प्रमाणपत्र दाखल केले नाही तर त्याला जिवंत मानले जात नाही. त्यानंतर त्याला पेन्शन मिळणे देखील बंद होते. मात्र, आता या कामासाठी आता पेन्शनधारकांना कुठेही जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया घरी बसून पूर्ण करत येणार आहे.

सरकारने सुरु केली ही प्रक्रिया

पेन्शनधारक कल्याण विभागाकडून गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर २०२३ रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता की, कोणताही पेन्शन प्राप्तकर्ता बँक, पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन माध्यमातून त्याचे जीवन प्रमाणपत्र दाखल करू शकतो. यासाठी बँकांकडून फेस ऑथेंटिकेशनचे तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर जीवन प्रमाणपत्र दिले जाईल.

जीवन ऑनलाइन कसे सबमिट करायचे?

-जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करण्यासाठी, तुम्हाला प्रथम Google Play Store वर जावे लागेल आणि आधार फेस आयडी ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

-जीवन प्रमान पत्र ॲप आता डाउनलोड करा.

-आपल्याला सर्व आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.

-नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती एंटर करा आणि सबमिट वर क्लिक करा.

-तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.

-आधार कार्डवर टाकलेले नाव लिहा आणि स्कॅन वर क्लिक करा.

-आता तुम्हाला तुमचा चेहरा स्कॅन करण्याची परवानगी मागितली जाईल. ज्यामध्ये तुम्हाला yes वर क्लिक करावे लागेल.

-ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी I am aware of this हा पर्याय निवडा.

-यानंतर तुमचा फोटो स्कॅन केला जाईल. ज्याचे रेकॉर्डही ठेवले जाणार आहे.

-ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पीपीओ क्रमांक आणि सत्यापित आयडी सबमिट केला जाईल.

-या प्रक्रियेद्वारे तुमचे जीवन प्रमाणपत्र घरी बसून सादर केले जाईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News