Multibagger Stocks : सध्या शेअर बाजरात असे अनेक शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देत आहेत. आज आपण अशाच एका शेअरबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने गेल्या काही काळापासून खूप चांगला परतावा दिला आहे.
आम्ही बोलत असलेल्या शेअरचे नाव ओरियनप्रो सोल्युशन्स असे आहे. साध्य हा शेअर रॉकेटच्या वेगाने धावत आहे. ओरियनप्रो सोल्यूशन्सचा शेअर बुधवारी 5 टक्के वाढून 2634 रुपयांवर पोहोचला आहे. अशातच ओरियनप्रो सोल्युशन्सने आपल्या गुंतवणूकदारांना आणखी एका आनंदाची बातमी दिली आहे.
कपंनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठी भेट जाहीर केली आहे. कंपनी गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देत आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक शेअरमागे 1 बोनस शेअर देत आहे. कंपनी बोनस शेअर्स भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.
Aurionpro Solutions Limited च्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स गेल्या 4 वर्षात 6300 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. OrionPro Solutions चे शेअर्स 7 मे 2020 रोजी 40.15 रुपये होते. 15 मे 2024 रोजी कंपनीचे शेअर्स 2634 रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या 3 वर्षांत, मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 1470 टक्केची वाढ झाली आहे. ओरियनप्रो सोल्युशन्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2799.65 रुपये आहे. त्याच वेळी, ओरियनप्रो सोल्यूशन्सच्या शेअर्सची 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 496.35 रुपये आहे.
Aurionpro Solutions चे शेअर्स गेल्या एका वर्षात रॉकेटप्रमाणे धावले. एका वर्षात कंपनीचे शेअर्स 370 टक्के पेक्षा जास्त वाढले आहेत. स्मॉलकॅप कंपनीचे शेअर 15 मे 2023 रोजी 551.45 रुपयांवर होते, जे 15 मे 2024 रोजी 2634 रुपयांवर पोहोचले. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 15 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 1841.45 रुपयांवर होते, जे आता 2600 रुपयांच्या पुढे गेले आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 6900 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीतील प्रवर्तकांची हिस्सेदारी 26.89 टक्के आहे.