30 नोव्हेंबरपर्यंत स्वस्त कार खरेदी करण्याची संधी; ‘असा’ घ्या अडीच लाखांपर्यंत डिस्काउंट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-मार्च 2020 पासून भारतीय ऑटोमोबाईल उद्योग प्रचंड मंदीच्या अवस्थेतून जात होता. परंतु गेल्या काही महिन्यांत या क्षेत्राची चांगलीच रिकवरी केली आहे. सणासुदीच्या मोसमातही कार सेगमेंटमध्ये चांगली विक्री झाली. दुसरीकडे, कार कंपन्यांनी दिलेल्या सूटचादेखील चांगला परिणाम दिसून आला.

उत्सवाचा काळ संपला आहे, परंतु कार कंपन्या अजूनही बऱ्याच मॉडेल्सवर सूट देत आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याकडे कारवर उत्तम डिस्काउंट मिळण्याची संधी आहे. अजूनही डिस्काउंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये क्विड, टाटा, होंडा, ह्युंदाई आणि मारुतीचा समावेश आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कारमध्ये किती डिस्काउंट मिळत आहे.

रेनॉल्टवर 1 लाखांपर्यंत डिस्काउंट :- रेनॉल्ट त्याच्या कारवर 1 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. रेनॉल्ट क्विड वर आपण 49000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसेच रेनोल्ड ट्रायबरवर 39 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येईल. यात 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बेनिफिट आणि 10 हजार रुपयांच्या लॉयल्टी बोनसचा समावेश आहे. याशिवाय 9 हजार रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सवलतही दिली जात आहे. रेनोल्ड डस्टरवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यात 50,000 रुपयांपर्यंतचे कॅश बेनिफिट , 20,000 रुपयांपर्यंत लॉयल्टी बेनेफिट आणि 25 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बेनिफिटचा समावेश आहे. टर्बोचार्ज्ड रेनो डस्टरवर 45,000 रुपयांपर्यंतचे बेनेफिट आणि 30,000 रुपयांपर्यंतची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहेत.

मारुती देत आहे मोठा डिस्काउंट:-  देशातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकी नोव्हेंबरमध्ये त्याच्या डिजायर, विटारा ब्रेझा आणि अर्टिगावर 46,000 रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. त्यात डिजायरवर 10,000 रुपयांची सूट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर मिळत आहे. म्हणजेच या कारवर एकूण 41 हजार रुपयांपर्यंत सवलत आहे. मारुतीच्या विटारा ब्रेझावर 20,000 रुपयांची सूट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांची कॉर्पोरेट ऑफर मिळेल. शेवटचा क्रमांक अर्टिगाचा आहे. या कारवर फक्त 6 हजार रुपयांची कॉर्पोरेट ऑफर देण्यात येत आहे.

टाटावर डिस्काउंट ऑफर :- टाटा आपल्या टिगोरवर 30,000 रुपयांपर्यंतचे बेनेफिट देत आहे. टाटा टिगोरवर 15 हजार रुपयांची सूट आणि 15 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. टाटा नेक्सनवर तुम्हाला 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल. टाटा हॅरियरला 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. या व्यतिरिक्त एक्सझेड +, एक्सझेडए + आणि डार्क एडिशन वगळता अन्य वेरिेएंट्सवर आपल्याला 25,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे.

ह्युंदाई 1 लाख रुपयांपर्यंतचा बेनेफिट देत आहे:-  डिस्काऊंट लाभ मिळणार्‍या ह्युंदाई कारमध्ये सॅंट्रोवर 45 हजार रुपयांपर्यंतच्या ऑफर्सचा समावेश आहे. तसेच कंपनीच्या ग्रँड आय 10 वर तुम्हाला 60 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळेल. कंपनीची तिसरी कार ग्रैंडआई 10 निओस, ज्यावर सवलत मिळत आहे. या गाडीवर तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता.

एलांट्रावर 1 लाख रुपये वाचवा:-  ह्युंदाई आपल्या एलांट्रावर 1 लाख रुपयांचा बेनेफिट देत आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये ह्युंदाई आय 20 वर कंपनीकडून 75 हजार आणि ह्युंदाई ऑरावर 30 हजार रुपये बेनेफिट देण्यात येत आहे.

होंडा सिव्हिकवर अडीच लाख रुपयांपर्यंतची सूट :- होंडा सिव्हिकच्या प्रत्येक पेट्रोल व्हेरिएंटवर एक लाख रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. तसेच त्याच्या पेट्रोल व्हेरिएंटवर अडीच लाखांपर्यंतची कॅश डिस्काउंट उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त होंडा त्याच्या जाझ आणि डब्ल्यूआर वर 40-40 हजार रुपयांचा बेनेफिट देत आहे. यामध्ये डिस्काउंट आणि एक्सचेंज बेनेफिट समाविष्ट आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment