Upcoming IPO:- सध्या शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून अगदी ग्रामीण भागामध्ये देखील आता अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळल्याचे दिसून येते. सध्या जर गेल्या काही दिवसांपासून आपण शेअर मार्केटची स्थिती बघितली तर त्यामध्ये सातत्याने घसरणच झाल्याचे दिसून येत आहे.
आपल्याला माहित आहे की,शेअर बाजारावर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम होत असतो व त्यावर शेअर बाजार उच्चांकी पातळी गाठतो तर कधी घसरण होत असते. परंतु सध्या घसरणीचे सत्र सुरू आहे.
परंतु या घसरणीच्या कालावधीत देखील मात्र आयपीओ मोठ्या प्रमाणावर बाजारात येताना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी याचप्रमाणे येणारा आठवडा हा गुंतवणूकदारांसाठी खास असणार आहे. कारण येणाऱ्या आठवड्यामध्ये शेअर बाजारात नवीन पाच आयपीओ खुले होणार आहेत व आठ आयपीओ लिस्ट होणार आहेत.
येणाऱ्या आठवड्यात येणार नवीन आयपीओ
सध्या शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळत आहे व असे असताना देखील मात्र दुसरीकडे बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ येत असून येणाऱ्या आठवड्यात देखील पाच नवीन आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुले होणार आहेत व त्यासोबतच आठ आयपीओ लिस्ट होणार आहेत.
या पाच आयपीओ पैकी बघितले तर एक मेन बोर्ड आहे तर चार एसएमई आयपीओ आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी कमाईची एक संधी चालून आली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. तसेच या पाच नवीन आयपीओ सोबतच आठ आयपीओ लिस्ट होणार आहेत व यामध्ये तीन मेनबोर्ड व पाच एसएमइ बोर्ड आयपीओ आहेत.
कोणते येणार आहेत नवीन आयपीओ?
1- यामध्ये बघितले तर एसएमई विभागातील चार आयपीओंपैकी पहिला आयपीओ हा अहमदाबाद येथील काबरा ज्वेल्सचा आहे. हा ज्वेलरी रिटेलर आपला 40 कोटींचा पहिला सार्वजनिक समभाग विक्री प्रस्ताव 15 जानेवारीपासून ओपन करणार आहे तर 17 जानेवारीला तो बंद होईल.
2-त्यासोबतच मुंबई येथील स्टॉक ब्रोकर रिखव सिक्युरिटीज 15 ते 17 जानेवारी दरम्यान 89 कोटींचा आयपीओ लॉन्च करणार आहे.या माध्यमातून ही कंपनी 89 कोटी रुपये उभारणार आहे.
3- तिसरा नंबरचा आयपीओ जर बघितला तर विदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक सल्लागार सेवा देणारी लँडमार्क इमिग्रेशन कन्सल्टंट ही कंपनी आहे. ही कंपनी 16 जानेवारीपासून आयपीओ आणणार आहे व 40.32 कोटींचा नवीन समभाग विक्री प्रस्ताव या माध्यमातून असणार असून 20 जानेवारीला तो बंद होणार आहे. ही कंपनी या माध्यमातून 40.32 कोटी रुपये उभारणार आहे.
4- तसेच इएमए पार्टनर्स इंडियाचा आयपीओ देखील येणार असून ही कंपनी भरतीसाठी सल्लागार फर्म म्हणून काम करते. 17 जानेवारी पासून 76 कोटींचा सार्वजनिक समभाग विक्रीसह 17 जानेवारीला बाजारात दाखल होणार आहे व 21 जानेवारीपर्यंत हा खुला असणार आहे. या माध्यमातून ही कंपनी 76 कोटी रुपये उभारणार आहे.