लक्ष द्या ! जानेवारीमध्ये १४ दिवस बँका बंद राहणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- नवीन वर्षाचा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळीकडे उत्साह दिसून येत आहे. यातच नववर्षाच्या सुरुवातील बँकांसंबंधी काही कामे रखडलेली असतील तर लवकर करून घ्या कारण जानेवारी महिन्यात बँका तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत.

आरबीआयने जानेवारी २०२१ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात १४ दिवस बँक बंद राहील. जानेवारी महिन्यात असलेल्या बँकांच्या सुट्ट्या

  • ०१ जानेवारी – नवीन वर्ष
  • ०२ जानेवारी – शनिवार आणि नववर्षाचे स्वागत
  • ०३ जानेवारी – रविवार
  • ०९ जानेवारी – दुसरा शनिवार
  • १० जानेवारी – रविवार
  • १४ जानेवारी – मकरसंक्रांत आणि पोंगल
  • १५ जानेवारी – तिरुवल्लुवर दिवस
  • १६ जानेवारी – उझावर थिरुनल
  • १७ जानेवारी – रविवार
  • २३ जानेवारी – चौथा शनिवार
  • २४ जानेवारी – रविवार
  • २५ जानेवारी – इमोइनू इरतपा
  • २६ जानेवारी – प्रजासत्ताक दिन
  • ३१ जानेवारी – रविवार
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News