फक्त 10 टक्के रक्कम भरा आणि मिळवा सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप संच! एकदा संच बसवला की 25 वर्षे नो टेन्शन

देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतीच प्रधानमंत्री कुसुम-बी या योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून महावितरण कडे फेब्रुवारी महिन्यात दोन लाख 70 हजार अर्ज याकरिता प्राप्त झालेले होते.

Ajay Patil
Published:
solar krushi pump

Solar Pumps:- सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहे व यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असून केंद्र सरकार सोबतच राज्य शासनाच्या देखील काही योजना या खूप महत्त्वाच्या आहेत.

शेतीच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेतीला दिवसा विज पुरवठा होणे खूप गरजेचे असल्याकारणाने या योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नुकतीच प्रधानमंत्री कुसुम-बी या योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून महावितरण कडे फेब्रुवारी महिन्यात दोन लाख 70 हजार अर्ज याकरिता प्राप्त झालेले होते.

या एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे एक लाख 64 हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्याची रक्कम भरली असून जवळपास 50 हजार 410 अर्जदार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यात आल्याची माहिती देखील महावितरण चे अध्यक्ष लोकेशचंद्र यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.

 दहा टक्के रक्कम भरून मिळणार सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाकरिता केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनल व कृषी पंप असा संपूर्ण सेट देण्यात येणार असून सरकारच्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून हे पंप बसविण्यात येणार आहेत.

राज्यातील महावितरणच्या माध्यमातून सहा महिन्याच्या कालावधीत सौर पंप बसवण्याचा जवळपास 50 हजाराचा टप्पा पार करण्यात आलेला आहे. तसेच याबाबत युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती देखील महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना लोकेश चंद्र यांनी म्हटले की, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना पाच टक्के रक्कम म्हणजेच त्यांच्या वाट्याचा हिस्सा हा भरावा लागतो व उरलेली रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळत असते.

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा तसेच लोड शेडिंग किंवा वीज बिलाच्या कुठल्याही प्रकारची चिंता नसणे हे सौर कृषी पंपाचे वैशिष्ट्य असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ही योजना खूप लोकप्रिय ठरली असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

एकदा शेतात सौर कृषी पंप संच बसवला की शेतकऱ्यांना 25 वर्ष नो टेन्शन

सौर ऊर्जा निर्मिती पॅनलच्या माध्यमातून पंचवीस वर्षांपर्यंत वीज निर्मिती होत असल्यामुळे एकदा का हा संच शेतामध्ये बसवला की शेतकऱ्यांना जवळपास पंचवीस वर्षांपर्यंत हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन यामुळे उपलब्ध होते.

शेतकरी पारंपारिक ग्रिडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही व त्यांना विज बिल देखील येत नाही. शेतामध्ये सिंचनाकरिता विजेचा पुरवठा दिवसा होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप सोयीची असल्याचे देखील लोकेश चंद्र यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,राज्य सरकारने दहा लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात अश्‍वशक्ती पर्यंतचे पंप मंजूर केले जातात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe