वर्षाला 20 रुपये भरा आणि 2 लाखाचे विमा कव्हर मिळवा! सरकारची ‘ही’ विमा योजना आहे खूपच फायद्याची

केंद्र सरकारची विमा योजना ही एक खूप फायद्याची अशी विमा योजना असून ही सरकारची योजना खास आर्थिक दृष्ट्यात दुर्बल घटकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली आहे.या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना होय व या योजनेला पीएमएसबीवाय असे देखील म्हटले जाते.

Pm Suraksha Bima Yojana:- विमा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण अशी आर्थिक बाब असून आयुष्यामध्ये प्रत्येकाने विमा घेणे ही काळाची गरज आहे.कारण जीवनामध्ये केव्हा कोणती परिस्थिती उद्धवेल किंवा कोणत्या परिस्थितीला अचानकपणे सामोरे जावे लागेल त्याचा कुठल्याही प्रकारचा भरवसा नसतो व त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता आपण आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि समृद्ध असणे खूप गरजेचे असते.

परंतु विमा घेणे हे प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण यामध्ये विम्याचा जो काही प्रीमियम असतो तो प्रत्येकालाच परवडेल असा नसतो व त्यामुळे कित्येक जण इच्छा असून देखील विमा घेण्यापासून वंचित राहतात.

त्यामुळे या दृष्टिकोनातून जर बघितले तर केंद्र सरकारची विमा योजना ही एक खूप फायद्याची अशी विमा योजना असून ही सरकारची योजना खास आर्थिक दृष्ट्यात दुर्बल घटकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेली आहे.या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना होय व या योजनेला पीएमएसबीवाय असे देखील म्हटले जाते.

वर्षाला केवळ 20 रुपये प्रीमियम भरून मिळते दोन लाख रुपयांचे संरक्षण
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अपघात झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते. या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला घेता येतो.

या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दोन लाख रुपयांचे संरक्षण देणाऱ्या या योजनेचा वर्षाला प्रीमियम फक्त 20 रुपये आहे व कोणतीही व्यक्ती सहजरित्या हे पैसे भरू शकते.

कोणत्या परिस्थितीमध्ये मिळतो या विमा योजनेचा फायदा?
या योजनेच्या माध्यमातून विमाधारक व्यक्तीचा अपघात झाला व त्यामध्ये तो पूर्णपणे अपंग झाला म्हणजे जसे की दोन्ही डोळे तसेच दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते.

तसेच दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच अपघातामध्ये एक हात किंवा एक पाय गमावला किंवा एका डोळ्यातील दृष्टी गमावली आणि ती परत मिळवता येणे अशक्य असेल तर एक लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळते.

काय आहेत या योजनेच्या प्रमुख अटी?

1- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी दिलेला वीस रुपयांचा वार्षिक प्रीमियम एक वर्षासाठी वैध असतो व त्यानंतर या योजनेचे नूतनीकरण म्हणजेच योजना रिनेव्हल करावी लागते.

2- अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आले तर विम्याची रक्कम ही योजनेच्या नियमानुसार दिली जाते.

3- अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे व अर्जदार हा भारतीय असणे आवश्यक आहे.

4- तसेच संबंधित विमाधारकाचे बँकेमध्ये सक्रिय बचत खाते असणे आवश्यक आहे व खाते जर बंद झाले तर पॉलिसी देखील बंद होऊ शकते.

5- तसेच या पॉलिसीच्या प्रीमियमसाठी ऑटो डेबिट करिता अर्जदाराला संमतीच्या फॉर्मवर सही करावी लागते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा करावा अर्ज?
तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही https://www.jansuraksha.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. तसेच तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या बँकेशी देखील संपर्क साधू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe