Personal Loan: ‘ही’ बँक देईल तुम्हाला पाच मिनिटात 50 हजार रुपये पर्सनल लोन!वाचा पात्रता,कागदपत्रे इत्यादी….

Published on -

Personal Loan:- जीवनामध्ये अचानक कुठल्याही प्रकारची आर्थिक गरज उद्भवू शकते. जर आपण यामध्ये एखादी मेडिकल इमर्जन्सी स्वतःला किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला उद्भवली तर प्रत्येक वेळी आपल्याकडे हवा तेवढा पैसा नसतो. अशावेळी आपण बँकांचा आधार घेतो.

बँकांच्या माध्यमातून प्रामुख्याने वैयक्तिक कर्जाचा पर्याय जास्त करून स्वीकारला जातो. प्रत्येक बँकांचे वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत पात्रता, कागदपत्रे तसेच व्याजदर देखील वेगवेगळ्या असतो. तसेच कर्ज मंजूरची प्रक्रिया हीदेखील वेगवेगळी असते. यामध्ये जर आपण बंधन बँकेचा विचार केला तर ही एक मायक्रो फायनान्स संस्था असून 17 जून 2015 ला बंधन बँकेला रिझर्व बॅंकेकडून बँकिंग परवाना मिळाला होता.

जर तुम्हाला एखाद्या वैयक्तिक आर्थिक कारणाकरिता बंधन बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुमचा सिबिल स्कोर उत्तम असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही पगारदार व्यक्ती किंवा तुमचा स्वतःचा लघुउद्योग किंवा स्वयंरोजगार असणे गरजेचे असून तुम्हाला बंधन बँकेतून वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

 बंधन बँकेतून तुम्हाला किती पर्सनल लोन मिळू शकते?

तुम्हाला जर पर्सनल लोन हवे असेल तर बंधन बँक ग्राहकांना 50 हजार ते पंधरा लाखापर्यंत पर्सनल लोन देते.अर्थात त्याकरिता अर्जदाराचा सिबिल स्कोर  उत्तम असणे गरजेचे आहे.

 बंधन बँकेतून पर्सनल लोन मिळवण्यासाठी काय पात्रता हवी?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बंधन बँक पर्सनल लोन साठी अर्ज करणारी व्यक्ती भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

2- स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तीचे वय 23 ते 60 वर्ष दरम्यान असावे.

3- नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.

4- अर्जदार व्यक्तीचे बँकेतील खाते क्रेडिट आणि डेबिट सक्रिय असणे गरजेचे आहे.

5- बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज मिळवण्याकरिता संबंधित अर्जदाराचे बंधन बँकेची किमान सहा महिन्यांपासून संबंध म्हणजे व्यवहार असणे गरजेचे आहे.

6- नियोजित आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्ती देखील बंधन बँक पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता.

 बंधन बँकेचे पर्सनल लोन घेण्यासाठी कुठली कागदपत्रे लागतात?

1- मूळ बँकेचे केवायसी कागदपत्रे

2- स्वयंरोजगार अर्जदाराकरिता P&L अकाउंट ची गणना

3- मागील दोन वर्षाच्या आयटीआर रिटर्न

4- नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी शेवटच्या तीन महिन्यांची पगार स्लिप आणि एक वर्षासाठीचा फॉर्म 16

5- पासपोर्ट आकाराचा फोटो

6- स्वाक्षरीचा पुरावा कागदपत्र ( पॅन कार्ड किंवा पासपोर्ट)

7- पत्त्याचा पुराव्या करिता (आधार कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार ओळखपत्र/ पॅन कार्ड/पासपोर्ट)

8- ओळखीचा पुरावा म्हणून( आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदार ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट)

 बंधन बँक पर्सनल लोनसाठी अर्ज कसा करावा?

1- याकरिता तुम्हाला घरबसल्या बंधन बँकेच्या कर्जाकरिता अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला https://bandhanbank.com/bandhan-personal-loan या वेबसाईटवर जाऊन पर्सनल लोन न्यू इंटरफेस शोधावा लागेल.

2- या ठिकाणी तुम्हाला बाणासमोरील पर्सनल लोनवर क्लिक करावे लागेल व त्यानंतर त्या ठिकाणी नवीन इंटर फेस ओपन होईल.

3- त्या ठिकाणी असलेल्या Apply Now बटनावर क्लिक करा.

4-या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, पिन कोड तसेच तुम्ही राहत असलेले शहर किंवा गाव इत्यादी नमूद करावे लागेल व सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.

5- त्यानंतर बंधन बँकेचे कर्मचारी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील आणि बँकेच्या  लोन विषयी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल.

6- त्यानंतर तुम्ही तुमची गरज पाहून या बँकेतून पर्सनल लोन घेऊ शकता.

 बंधन बँक पर्सनल लोन चा व्याजदर किती आहे?

जर तुम्ही बंधन बँकेकडून पर्सनल लोन घेतले तर त्याचा व्याजदर वार्षिक 15.90 ते 20.75 टक्के इतका आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe