Personal Loan:- आपत्कालीन पैशाची गरज भागवण्यासाठी बऱ्याचदा आपल्याला पाहिजे जितका पैसा आपल्या स्वतःकडे नसल्याकारणाने आपल्याला कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागतो व याकरिता मित्र तसेच नातेवाईक यांच्याकडून पैशांची तजवीज करावी लागते.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे या व्यतिरिक्त बँका किंवा इतर वित्तीय संस्थाच्या माध्यमातून कर्जाचा पर्याय निवडून कर्जासाठी अर्ज करून पैशांची व्यवस्था आपल्याला करता येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये कर्ज घेताना जास्त करून पर्सनल लोनचा पर्याय वापरला जातो.
या पद्धतीचे पर्सनल लोन बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी च्या माध्यमातून प्रामुख्याने घेतले जाते. परंतु बँकांव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील पोस्ट ऑफिसच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून देखील पर्सनल लोन घेता येणे शक्य आहे.
या माध्यमातून 50000 पासून ते पाच लाख रुपयापर्यंत पर्सनल लोन घेतले जाऊ शकतात. विशेष म्हणजे याचा व्याजदर देखील खूप कमी असतो. या लेखात आपण इंडिया पोस्ट बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घेण्याची माहिती बघणार आहोत.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून मिळेल 50 हजार ते पाच लाखापर्यंत कर्ज
बँकांव्यतिरिक्त तुमची आपत्कालीन पैशांची गरज भागवण्यासाठी तुमच्या मदतीला इंडिया पोस्ट बँक येऊ शकते. या बँकेच्या माध्यमातून तुम्ही पर्सनल लोन, व्यवसाय कर्ज तसेच गोल्ड लोन, वाहन कर्ज इत्यादी घेऊ शकतात. या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला पन्नास हजारापासून ते पाच लाख रुपये पर्यंतच्या कर्जाची सुविधा दिली जात आहे.
इंडिया पोस्ट बँकेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या बँकेकडून कमीत कमी व्याज दारात कर्ज मिळते व कर्ज घेण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. याकरिता तुम्हाला ऑनलाईन सेवा विनंती करावी लागते व त्यानंतर पोस्टमन स्वतः घरी येऊन त्यासंबंधीची प्रक्रिया करतो आणि कर्ज मंजूर केले जाते.
इंडिया पोस्ट पेमेंट बँक कर्जाचे फायदे आणि वैशिष्ट्ये
1- याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून कर्ज घेणे खूप सोपे आहे.
2- यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सेवा विनंती सबमिट करणे गरजेचे असते.
3- यामध्ये तुम्हाला छोट्या ते मोठ्या कर्जाची सुविधा लवकरात लवकर मिळते.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून कर्ज घेण्यासाठीची पात्रता
1- अर्जदार हा कायमस्वरूपी भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे व भारतीय नागरिकाच्या कर्जासाठी पात्र असतील.
2- तसेच अर्जदाराकडे कोणत्या ना कोणत्या उत्पन्नाचे साधन असणे खूप गरजेचे आहे.
3- इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून कर्जाकरिता अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत कर्जाकरिता कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता असते?
तुम्हाला देखील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर त्याकरिता आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड तसेच व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे व मोबाईल नंबर आवश्यक असतो.
अशा पद्धतीने करावा लागतो ऑनलाइन अर्ज
1- याकरता सर्वात प्रथम इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
2- त्यानंतर मुख्य पृष्ठावरील मेनू पर्यायावर क्लिक करा.
3- त्यानंतर सेवा विनंती पर्यायावर जावे आणि आयपीपीबी किंवा नॉन आयपीपीबी ग्राहक पर्याय निवडावा. समजा तुमचे पोस्ट ऑफिस मध्ये खाते असेल तर आयपीपीबी ग्राहक पर्याय निवडा व त्यानंतर तुम्हाला डोअरस्टेप बँकिंगचा पर्याय मिळेल व त्यावर क्लिक करावे.
4- त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडते व त्यामध्ये तुम्हाला पर्सनल लोन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
5- त्यानंतर अर्ज भरण्यासाठी एक पेज मिळेल व त्यावर तुमचे नाव, तुमचा पत्ता तसेच ई-मेल ऍड्रेस व मोबाईल नंबर व आवश्यक माहिती भरावी लागेल.
6- फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर तुम्हाला कॅपच्या कोड टाकून अर्ज सबमिट करावा लागेल अशाप्रकारे तुमचा अर्ज सक्सेसफुली पूर्ण होतो.
7- त्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून उपलब्ध असलेल्या कर्जाची माहिती दिली जाते.
8- नंतर तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत जाऊन सर्व कागदपत्रे जमा करावे लागतात.
9- संपूर्ण आवश्यक प्रक्रिया पूर्ण होते व कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.