आता ATM वर छापला जाऊ शकतो आपल्या मुलांचा फोटो ; जाणून घ्या नवीन सुविधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- स्टेट बँकेने मुलाच्या खात्यावर देण्यात येणाऱ्या एटीएम कार्डवर मुलांचा फोटो लावण्याची सुविधा दिली आहे. एसबीआयने मुलांसाठी दोन प्रकारची बँक खाती उघडली आहेत.

या दोन्ही प्रकारच्या बँक खात्यात एटीएम दिले जातात. जर पालकांना हवे असेल तर या खात्यासाठी येणाऱ्या एटीएम कार्डवर मुलाचा फोटो मुद्रित केला जाऊ शकतो.

एसबीआयमध्ये मुलांसाठी दोन प्रकारची खाती आहेत :- देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयने अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यावर अनेक आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. बँकेने ‘पहला कदम’ व ‘पहली उड़ान’ या दोन योजनांसाठी खाती उघडण्यासाठीही बँकेने ऑनलाईन सुविधा दिली आहे. एसबीआयने आपल्या संकेतस्थळावर अल्पवयीन मुलांसाठी दोन बचत खाती सुरू केली आहेत. यासह त्यांना नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग सारख्या सुविधा देखील मिळतात. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, दोन्ही खात्यात पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा देखील निश्चित केली गेली आहे, जेणेकरून ते अनावश्यक पैसे खर्च करु शकणार नाहीत.

इंटरनेट बँकिंग :- ‘पहला कदम’ आणि ‘पहली उड़ान’ या दोन्ही बँक खात्यात इंटरनेट बँकिंग अंतर्गत चौकशीचे मर्यादित व्यवहार आणि अधिकार देण्यात आले आहेत. जसे- बिल भुगातन;डिपॉजिट / ई-स्पेशल टर्म डिपॉजिट/ई-रिकरिंग डिपॉजिट उघडणे, इंटर -बँक निधी हस्तांतरित करणे आणि डिमांड ड्राफ्ट जारी करणे आदी. इंटरनेट बँकिंगमधून दररोज व्यवहाराची मर्यादा 5000 रुपये आहे.

 हे खाते कसे उघडावे ते जाणून घ्या :- एसबीआय मधील पहला कदम हे खाते पालकांसमवेत संयुक्तपणे उघडले जाऊ शकते. हे खाते पालकांसह मुलाद्वारे ऑपरेट केले जाऊ शकते. पहली उड़ान हे बँक खाते 10 वर्षांपेक्षा मोठ्या मुलाच्या नावे उघडले जाऊ शकते. मूल हे खाते हाताळते. तथापि या बँक खात्यासाठी केवायसी आवश्यक आहे.

 वैशिष्ट्ये

  • १) मासिक सरासरी शिल्लक असणे आवश्यक नाही. खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये जमा करण्याची सुविधा तसेच दोन्ही खात्यात चेक बुकची सुविधा.
  • २) फोटोसह एटीएम कम डेबिट कार्ड दिले जाईल, ज्यामध्ये आपण दररोज 5 हजार रुपयांचे व्यवहार करू शकता. मोबाइल बँकिंगच्या सुविधेमध्ये आपण 2 हजार रुपयांपर्यंतचे बिल भरू शकता.
  • ३) कमीतकमी 20 हजार रुपयांच्या मर्यादेसह ऑटो स्वीप सुविधा. ‘पहला कदम ‘ या खात्यात पालक किंवा गार्जियन ओवर ड्रॉफ्टची सुविधा असेल.
  • ४) याशिवाय मुले आरडी खातेदेखील उघडू शकतात, त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment