Piramal Finance Personal Loan: पिरामल फायनान्स देईल 5 ते 50 हजारापर्यंत झटक्यात पर्सनल लोन! वाचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

personal loan

Piramal Finance Personal Loan:- पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, ही पिरामिल समूहाची आघाडीची कंपनी असून ग्राहकांना विविध ऑनलाइन बँकिंग सेवा आणि वित्तीय सेवा प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. याशिवाय ही कंपनी विविध प्रकारचे कर्ज देखील ग्राहकांना प्रदान करते.

यापैकी एक प्रमुख म्हणजे वैयक्तिक कर्ज अर्थात पर्सनल लोन हे होय. हे कर्ज बँक ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रदान करते. जसे की वैद्यकीय आणीबाणी, सण उत्सव किंवा शिक्षण इत्यादी साठी पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्ज देते.या कर्जाकरिता पिरामल फायनान्स चे ग्राहक ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण पिरामल फायनान्स पर्सनल लोन विषयी संपूर्ण माहिती घेऊ.

 पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्जाचे स्वरूप

पिरामल फायनान्स ग्राहकांच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन देते. कंपनीच्या माध्यमातून 12.99% वार्षिक व्याजदरा पासून ही कर्ज सुविधा ग्राहकांना दिली जाते. या अंतर्गत बँक ग्राहकांना पाच वर्षाच्या हप्त्यांमध्ये दहा लाख रुपयाची कर्जाची रक्कम देते. ही कर्जाची रक्कम ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी वापरता येते.

यामध्ये घराचे नूतनीकरण, प्रवास तसेच लग्नकार्य व वैद्यकीय आणीबाणी इत्यादी कामांसाठी पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्ज फायद्याचे ठरते. पिरामल फायनान्स ने ऑफर केलेल्या वैयक्तिक कर्जाच्या संधी अंतर्गत ग्राहकांना विविध प्रकारच्या कर्जाच्या कालावधी सोबत जास्तीत जास्त दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते व याची कमाल परतफेड कालावधी हा पाच वर्षाचा आहे

पात्र ग्राहकांना पिरामल फायनान्स कडून त्वरित कर्ज पुरवठा केला जातो व त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजा पटकन पूर्ण करण्यासाठी वाव मिळतो. एवढेच नाही तर या कर्जाकरिता तुम्हाला अत्यंत कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

 पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्जाकरिता महत्त्वाच्या अटी

1- पगारदार अर्जदार बँकेकडून वैयक्तिक कर्जाकरिता अर्ज करू शकतात.

2- कर्जाकरिता सह अर्जदार म्हणून पती/ पत्नी अर्जदार असू शकतात.

 पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

पिरामल फायनान्स वैयक्तिक कर्जाकरिता अर्जदाराने काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे गरजेचे असते. या कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने….

1- ओळखीचा पुराव(आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड )

2- रहिवासी पुरावा( ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, युटिलिटी बिल( वीज आणि टेलिफोन बिल), रेशन कार्ड

3- उत्पन्नाचा पुरावा म्हणून शेवटच्या एका महिन्याची पगार स्लीप आणि शेवटचे तीन महिन्यांचे बँकेचे स्टेटमेंट)

 पिरामल  फायनान्स पर्सनल लोनकरीता ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1- प्रथम अर्जदाराला पिरामल फायनान्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

2- या ठिकाणी होम पेजवर लोन प्रॉडक्ट या पर्यायावर क्लिक करा.

3- त्यानंतर इतर उत्पादने विभागात वैयक्तिक कर्ज पर्याय निवडा.

4- पुढील पेजवर व्याजदर, आवश्यक कागदपत्रे तसेच प्रक्रिया शुल्क इत्यादी बद्दल आवश्यक माहिती वाचा आणि आता अर्ज करा बटणावर क्लिक करा.

5- मोबाईल नंबर एंटर करा आणि कंटिन्यू वर क्लिक करा. नंतर तुमच्या मोबाईलवर मिळालेला ओटीपी इंटर करा आणि तो त्या ठिकाणी सत्यापित करा.

6- त्यानंतर पॅन कार्ड तपशील भरा आणि पुष्टी करा.

7- तुमचा रोजगार प्रकार निवडा आणि तुमच्या नियोक्त्याचा तपशील भरा.

8- तुमची मासिक वेतन किती आहे त्याचा संपूर्ण तपशील भरा आणि सुरू ठेवा बटणावर क्लिक करा.

9- त्यानंतर तुमचा ईमेल आयडी सत्यापित करा व ईमेल पडताळणी नंतर सुरू ठेवा वर क्लिक करा.

10- आता केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि पॅन कार्डचा तपशील टाका.

11- ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुम्ही पात्र असल्यास कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe