PM Jandhan Account : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा लाखो लोक घेत आहेत. आता तुम्ही सरकारच्या एका योजनेअंतर्गत झिरो बॅलन्सवर खाते चालू करू शकता. विशेष म्हणजे हे खाते चालू केल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल.
प्रधानमंत्री जनधन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला बँकेत खाते चालू करता येते. या खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विम्यासह इतर सुविधांचा लाभ घेता येतो. जाणून घ्या त्याबद्दल सविस्तर माहिती.
एका आकडेवारीनुसार, देशभरात प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी 56 टक्क्यांक्षा जास्त खाती महिलांची आहेत. 67 टक्के बँक खाती ग्रामीण किंवा निमशहरी भागात असून या खात्यांमध्ये 2.03 लाख कोटी रुपयांक्षा जास्त पैसे जमा झाले आहेत.
जाणून घ्या फायदे
या खात्याचे खूप फायदे आहेत. PMJDY खातेधारकांच्या खात्यात, अनुदान, पेन्शन, शिष्यवृत्ती आणि इतर सरकारी योजनांचे पैसे थेट लाभ हस्तांतरण (DBT) अंतर्गत थेट त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येतात. प्रत्यक्षात आता जवळपास सर्वच सरकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
या योजनेंतर्गत खाती बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर चालू केली जातात. या खातेधारकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विम्यासह मोफत रुपे डेबिट कार्ड आहे. या खातेधारकांना बँकांकडून 10,000 रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील मिळते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेंतर्गत, खातेधारकांना त्यांच्या खात्यात कमीत कमी शिल्लक ठेवण्याची गरज पडत नाही. या योजनेअंतर्गत देशातील कोणताही नागरिक ज्याचे कोणतेही बँक खाते नाही त्याला ते चालू करता येते. यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जावे लागणार आहे. किंवा तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://pmjdy.gov.in/home वरून फॉर्म डाउनलोड करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांसह जवळच्या बँकेत जावे लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, मनरेगा कार्ड, पासपोर्ट किंवा पॅन सारखी कागदपत्रे सोबत असावीत.