Post Office : तुमच्या पत्नीसोबत मिळून चालू करा ‘हे’ खाते, प्रत्येक महिन्याला मिळेल 9250 रुपयांचे व्याज

Published on -

Post Office : जर तुम्हालादेखील प्रत्येक महिन्याला घरी बसून चांगले पैसे कमवायचे असतील तर बातमी तुमच्या खूप कामाची आहे. आता तुम्ही पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये गुंतवणूक करुन तुम्ही प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करु शकता.

त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या पत्नीसोबत मिळून पोस्ट ऑफिसमध्ये जॉइंट अकाऊंट चालू करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 9250 रुपयांचे हमखास व्याज मिळेल. विशेष म्हणजे अनेकजण या योजनेत पैसे गुंतवत आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

ही पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना आहे, यात जर तुम्ही एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर प्रत्येक महिन्याला एकूण 9250 रुपये मिळतील. हे लक्षात घ्या की ही रक्कम पती-पत्नीला स्वतंत्रपणे दिली जाते. तसेच 2023 च्या अर्थसंकल्पात मर्यादा दुप्पट केली असून आता या योजनेत तुम्ही एकल आणि संयुक्त दोन्ही खाते चालू करू शकता. जाणून घेऊयात या योजनेबद्दल अधिक माहिती.

करावी लागणार इतकी गुंतवणूक

आता पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्ही एका खात्यात 9 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक सहज करू शकता. तसेच संयुक्त खाते म्हणजे पत्नी-पतीला एकत्र 15 लाख रुपये गुंतवता येतील. सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना वर्षाला एकूण ७.४ टक्के इतके व्याज मिळत आहे. तसेच तुम्हाला पाहिजे असेल तर, मॅच्युरिटी कालावधीनंतर एकूण मूळ रक्कम काढू शकता. किंवा तुम्ही गुंतवणूक एकूण 5-5 वर्षे वाढवू शकता. हे लक्षात घ्या की तुमचे मासिक उत्पन्न खात्यावर प्राप्त झालेल्या 9250 व्याजातून असणार आहे.

जाणून घ्या फायदे

पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेवर संबंधित गुंतवणूकदाराला मासिक उत्पन्नाची हमी दिली जाते. समजा, या योजनेत संयुक्त खाते चालू केले तर त्यात 15 लाख रुपये जमा केले आहेत. आता या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.4 टक्के दराने एकूण 1,11,000 रुपये वर्षाला व्याज मिळेल. समजा तुम्ही 12 महिन्यांत विभागले तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 9250 रुपये व्याज मिळतात. या योजनेत तुम्ही तीन लोकांसोबत खाते चालू करू शकता. या खात्यात मिळणारे व्याज प्रत्येक सदस्याला समान देण्यात येते.

… होईल नुकसान

पोस्ट ऑफिसच्या या योजनेची मॅच्युरिटी 5 वर्षानंतर आहे. आता तुम्हाला ठेवीच्या तारखेपासून एक वर्षानंतर पैसे काढता येतात. परंतु जर तुम्ही एक वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान पैसे काढल्यास तुम्हाला ठेव रकमेतून 2% वजा करून पैसे परत दिले जातात. परंतु जर तुम्ही एकूण 3 वर्षांनी पैसे काढले तर तुम्हाला 1% वजा केल्यावर उरलेली रक्कम मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News