Post Office RD : जर तुम्ही सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्मॉल सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये जोखीम न घेता आणि हमीपरताव्यासह दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता. याशिवाय पोस्ट ऑफिस स्कीम्सवर तुम्हाला अनेक फायदे देखील मिळतात. तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. आज आपण याबद्दच जाणून घेणार आहोत.
सध्या सरकारने पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवरील व्याजदरात 20 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. 1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस RD वर आता 6.5 टक्क्यांऐवजी 6.7 टक्के वार्षिक व्याज मिळेल.
आरडीवर कर्ज घेण्याची सुविधा !
आरडी खात्यावर ग्राहक सहज कर्ज देखील घेऊ शकतात. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या आरडीवर कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर लक्षात घ्या खाते एका वर्षासाठी उघडले पाहिजे म्हणजेच खाते एक वर्ष जुने असावे. आरडी खातेधारकाला पोस्ट ऑफिसमधून त्याच्या खात्यातील शिल्लक रकमेच्या केवळ 50 टक्के कर्ज मिळू शकते. कर्जाची रक्कम एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत केली जाऊ शकते. पोस्ट ऑफिसमधून घेतलेल्या या कर्जासाठी ग्राहकाला आरडीच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के जास्त व्याज द्यावे लागेल. समजा तुम्हाला RD वर ६.३ टक्के व्याज मिळत असेल, तर कर्जाचा व्याजदर ८.३ टक्के असेल.
कर्ज कसे घ्यावे?
आरडी खात्यावर कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या पासबुकसह कर्जाचा फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून कर्ज मिळेल.
इतके व्याज मिळतील
दरमहा ५,००० रुपयांच्या आरडीमध्ये, तुम्ही एका वर्षात ६०,००० रुपये आणि पाच वर्षांत एकूण ३,००,००० रुपयांची गुंतवणूक कराल. तुम्हाला 5 वर्षानंतर 6.7 टक्के दराने 56,830 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,56,830 रुपये मिळतील. तुम्ही आरडीमध्ये दर महिन्याला 3,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही एका वर्षात 36,000 रुपये गुंतवाल. 5 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक रु 1,80,000 असेल. पोस्ट ऑफिसच्या आरडी कॅल्क्युलेटरनुसार, नवीन व्याजदरांनुसार, तुम्हाला 34,097 रुपये व्याज म्हणून मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2,14,097 मिळतील.